Jalgaon News : विहिरीत पडलेल्या 3 काळविटांना वन कर्मचाऱ्यांसह तरुणांकडून जीवदान

तालुक्यातील रामेश्वर शिवारातील शेताच्या विहिरीत रात्रीच्या सुमारास पडलेल्या तीन काळविटांना वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावातील तरुण तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने वाचविण्यात यश आले.
A young man trying to save a black man who had fallen into a well.
A young man trying to save a black man who had fallen into a well.esakal

Jalgaon News : तालुक्यातील रामेश्वर शिवारातील शेताच्या विहिरीत रात्रीच्या सुमारास पडलेल्या तीन काळविटांना वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावातील तरुण तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने वाचविण्यात यश आले.

तालुक्यातील रामेश्वर येथील एका विहिरीत तीन काळवीट पडल्याची माहिती सरपंचांनी वनपाल पी. जे. सोनवणे यांना दिली. (3 Antelope who fell in well were rescued by forest staff and youth jalgaon news)

A young man trying to save a black man who had fallen into a well.
Jalgaon News : आरोग्य यंत्रणेचे उपक्रम प्रभावीपणे राबवावे; सीईओ अंकित यांच्या सूचना

त्यानंतर त्यांनी वनमजुरांसह त्या विहिरीच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्यासह गावातील पोलिस पाटील व इतर ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी विहिरीत पाहिले असता तीन काळवीट विहिरीत पडलेले दिसले.

त्यामुळे त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी त्यानी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्याचे नियोजन केले. या वेळी प्रदीप नावाच्या तरुणाने खाटेच्या सहाय्याने विहिरीत उतरून मोठ्या कसरतीने त्या तीन काळवीटांना बाहेर काढण्यास मदत करून त्यांना जीवदान दिले.

काळविटांना किरकोळ लागल्यामुळे त्यांची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांच्या आधीवासात सोडण्यात आले. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या हल्ल्यापासून बचाव करताना विहिरीचा अंदाज न आल्याने काळवीट विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

A young man trying to save a black man who had fallen into a well.
Jalgaon Winter Update : थंडीच्या लाटेने जळगाव जिल्ह्यात हुडहुडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com