Jalgaon News : आरोग्य यंत्रणेचे उपक्रम प्रभावीपणे राबवावे; सीईओ अंकित यांच्या सूचना

जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
Chief Executive Officer Ankit while guiding the review meeting
Chief Executive Officer Ankit while guiding the review meetingesakal

Jalgaon News : जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या वेळी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवून नेमून देण्यात आलेले उद्दिष्टे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना श्री अंकित व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी यावेळी दिल्या. (CEO Ankit statement Implement health system activities effectively jalgaon news)

जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात जिल्हाभरातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची आढावा बैठकआयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयवंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जायभाय आदी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय जंतनाशक मोहीम, कुष्ठरोग स्पर्श जनजागृती कार्यक्रम.

कुटुंब नियोजन कार्यक्रम, आभा कार्ड, गोल्डन कार्ड उपक्रम, माता बाल संगोपन, व साथ रोगा संदर्भात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.

Chief Executive Officer Ankit while guiding the review meeting
Jalgaon News : महाराष्ट्र केसरी-जम्मू केसरी एकमेकांना भिडणार; 5 लाखांचे बक्षीस

या दिल्या सूचना

राष्ट्रीय कार्यक्रमाची गुणवत्ता वाढवणे मार्चअखेर नेमून दिलेले उपक्रमांची शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे, कुटुंब कल्याण कार्यक्रम तसेच माता बाल संगोपन कार्यक्रम प्रभावीपणे राबवून उपाययोजना करणे,तसेच क्षयरोग व कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा सुव्यवस्थितरित्या पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवून यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या.

Chief Executive Officer Ankit while guiding the review meeting
Jalgaon Winter Update : थंडीच्या लाटेने जळगाव जिल्ह्यात हुडहुडी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com