Jalgaon Winter Update : थंडीच्या लाटेने जळगाव जिल्ह्यात हुडहुडी

यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच तापमानाचा पारा ८ अंशांखाली गेला.
Winter
Winter esakal

Jalgaon Winter Update : गेल्या तीन- चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यासह खानदेशात थंडीचा गारठा वाढला आहे. अक्षरश: हुडहुडी भरविणारी थंडी नेमकी मोसम संपण्याच्या मार्गावर असताना उमळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच तापमानाचा पारा ८ अंशांखाली गेला आहे.

साधारणत: नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशा चार महिन्यांत आपल्याकडे थंडीचा मोसम असतो. डिसेंबर महिन्यात थंडी जाणवते, असाही नेहमीचा अनुभव. (cold temperature has increased in jalgaon district news)

परंतु, यंदा संपूर्ण डिसेंबर महिना आणि जानेवारीचा पहिला पंधरवडा थंडीविनाच गेला. डिसेंबरअखेर थंडी वाढेल, अशी शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही.

जानेवारीअखेरीस थंडी

आणि थंडीचा मोसम संपत आलेला असताना ऐन जानेवारीच्या अखेरीस थंडी वाढली आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून थंडीची लाट आली आहे.

उत्तरेकडील गार वारे, बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात थंडी वाढली असून किमान तापमान कमालीचे घसरले आहे. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशात हीच स्थिती आहे.

Winter
Nagpur Winter Update : गुरुवारची रात्र ठरली मोसमातील सर्वात थंड ; नागपूरच्या पाऱ्यात पुन्हा सहा अंशांची घट

तापमानाचा पारा खाली

यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच एवढी थंडी पडली आहे. बुधवारी जळगावचे किमान तापमान ९ अंशांखाली गेले होते.

तर गुरुवारी ते आठ अंशांच्या खाली आल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, दिवसभर हुडहुडी भरविणारी थंडी असते. भर दिवसा उन्हातही गारठा जाणवतो, अशी सध्याची स्थिती आहे.

किमान व कमाल तापमानही घसरल्याने थंडीचा कहाका अधिक जाणवत आहे. संपूर्ण मोसमात ऊबदार कपडे निघाले नाहीत, ते स्वेटर, मफ्लर आता बाहेर निघाले असून त्याची गरज भासत आहे.

Winter
Nashik Winter Update : निफाड 4.4 अंश, नाशिक 8.6 अंशावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com