बनावट लग्नप्रकरणी फरार तिघांना अटक

बनावट लग्न प्रकरणातील वधूसह तिघांना पोलिसांनी चिखली (जि. बुलढाणा) येथून शिताफीने अटक केली.
Police arrest
Police arrestesakal
Updated on

पाचोरा (जि. जळगाव) : पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील पोलिस ठाण्यत दोन वर्षांपासून दाखल असलेल्या बनावट लग्न प्रकरणातील वधूसह तिघांना पोलिसांनी चिखली (जि. बुलढाणा) येथून शिताफीने अटक केली.

याबाबत माहिती अशी की, पिंपळगाव हरेश्वर येथे २०२० मध्ये बनावट वधू उभी करून लग्न लावून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी या प्रकरणाचा छडा लावून दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयितांच्या शोधासाठी रणजीत पाटील, पंकज सोनवणे, योगिता चौधरी यांचे स्वतंत्र पथक तयार केले. या गुन्ह्यातील तिघे संशयित चिखली (जि. बुलढाणा) येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन त्यांन मोठ्या शिताफीने अटक केली. वधू पूजा ठाकरे, चंद्रकला ठाकरे व अमोल सुरशे असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांची कसून चौकशी केली असता, संबंधित वधूने यापूर्वी चार वेळा असाच बनावट विवाह केला असल्याचे निष्पन्न झाले.

Police arrest
व्यसनासाठी काहीपण! महादेव मंदिरातून घंट्यासह कलशाची चोरी
Police arrest
रुळांवर चालला खराखुरा ट्रक; मुंबईकरांच्या मेट्रोसाठी काहीपण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com