Jalgaon Crime News : जळगावात एमपीडीएचा ट्रिपल धमाका; एकाच दिवसात 3 अट्टल गुन्हेगारांना टाकले कारागृहात

3 criminals have been arrested by MPDA jalgaon crime news
3 criminals have been arrested by MPDA jalgaon crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : जिल्‍ह्‍यातील गुन्हेगारीवर पोलिस आणि महसूल प्रशासनाने धडक कारवाईला सुरवात केली आहे. गुन्हेगारी क्षेत्राला धक्का देत एकाच दिवसात तीन अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करून कारागृहात टाकले आहे.

विशाल भिका कोळी (२४, पिंप्राळा, जळगाव), हसनअली ऊर्फ आशू नियाजअली इराणी (२४, रा.इराणी मोहल्ला भुसावळ), विशाल दशरथ चौधरी (२७, भोईवाडा अमळनेर) अशी तिघांची नावे आहेत. (3 criminals have been arrested by MPDA jalgaon crime news)

जळगाव जिल्‍ह्‍यातील वाढती गुन्हेगारी, गोळीबाराच्या सतत घडणाऱ्या घटनांसह सक्रिय आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्‍हा प्रशासन व पोलिस दलाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या स्वाक्षरीने आज अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांअंतर्गत कारवाई करण्यात आली.

एमपीडीएअंतर्गत अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगारांमध्ये रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विशाल भिका कोळी (२४, रा. पिंप्राळा कोळीवाडा) याच्यावर फौजदारी स्वरूपाचे तब्बल अकरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. ५ अदखलपात्र गुन्हे वेगळे आहेत. त्याच्यावर दोन वेळा हद्दपारीची कारवाई करूनही त्याच्यात सुधारणा झाली नाही.

गुन्हा करून सुटला, की नव्याने गुन्हा करण्याची त्याची प्रवृत्ती असल्याने पोलिस दलातील रेकॉर्डनुसार समाजासाठी घातक प्रवृत्ती म्हणून त्याला एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

भुसावळचा अट्टल गुन्हेगार

गुन्हेगारीचे माहेरघर असलेल्या भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार हसनअली ऊर्फ आशू नियाजअली इराणी (वय-२४) याच्या विरुद्ध एकट्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात तब्बल ११ फौजदारी गुन्हे दाखल असून दोन वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

3 criminals have been arrested by MPDA jalgaon crime news
Jalgaon Crime News : जळगावच्या डॉक्टरची केईएम रुग्णालयात आत्महत्या; ऑनड्यूटी मृतावस्थेत आढळला

हा गुन्हेगार जबरीलूटच्या गुन्ह्यात निष्णात असून घरफोड्या, चोऱ्यांसह बेकायदा शस्त्र प्रकरणांतही सापडला आहे. गुन्हा केल्यावर गावच नाही तर, महाराष्ट्र सोडून पसार होत असल्याचे तपास पथकाने सांगितले.

अमळनेरचा विशाल चौधरी

दंगल, दगडफेकीच्या गुन्ह्याने गुन्हेगारीची सुरवात केलेल्या अमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विशाल दशरथ चौधरी (२७, रा. भाईवाडा अमळनेर) या गुन्हेगारांवर सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

एक अदखलपात्र गुन्ह्यासोबतच पाच वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्यावर नियंत्रण येत नसल्याने पोलिसदलाने त्याची कुंडली धुंडाळून एपीडएअंतर्गत आज स्थानबद्ध करून त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

असे पथक अशी मेहनत

जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील, रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या महिला निरीक्षक शिल्पा पाटील, भुसावळचे निरीक्षक गजानन पडघम, अमळनेरचे निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक निरीक्षक हरीष भोय, उपनिरीक्षक किशोर पाटील, दीपक माळी, रवी पाटील, सिद्धू शिसोदे, अनिल भुसारे, दीपक माळी, आत्माराम भालेराव, सुनील जोशी, रमण सुरळकर, संजय सपकाळे, सुशील चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी यांच्यासह गुन्हेशाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांनी प्रस्ताव तयार करून गुन्हेगारांना कारागृहात रवाना करण्यापर्यंत जबाबदारी पार पाडली.

3 criminals have been arrested by MPDA jalgaon crime news
Jalgaon Crime News : घर नावावर का करत नाही म्हणत सख्ख्या भावानेच भावाच्या डोक्यात मारली पावडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com