Jalgaon Crime News : सावदा येथे 1 रात्रीत 3 ठिकाणी घरफोड्या

शहरासह परिसरात शनिवारी (ता. २०) रात्री एकाच तीन घरफोड्या झाल्या. एका घरातील लॉकरमधील साडेचार लाखांचे सोने चोरट्यांनी लंपास केले.
3 house burglaries in Sawada in 1 night jalgaon
3 house burglaries in Sawada in 1 night jalgaonesakal

Jalgaon Crime News : शहरासह परिसरात शनिवारी (ता. २०) रात्री एकाच तीन घरफोड्या झाल्या. एका घरातील लॉकरमधील साडेचार लाखांचे सोने चोरट्यांनी लंपास केले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील स्वामीनारायण नगरात चोरट्यांनी भांड्यांचे व्यापारी भागवत कासार यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून घरात प्रवेश करून साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी कासार यांनी सावदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (3 house burglaries in Sawada in 1 night jalgaon crime news)

कासार यांच्या घरातून सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे मंगलपट आणि अंगठी, कानातले असा एकूण ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला. जळगाव येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले.

तसेच जळगाव पोलिसांचे ठसे तज्ज्ञही घटनास्थळी आले. मात्र, श्वान पथक संपूर्ण पायवाटा शोधू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी सहकाऱ्यांसह पंचनामा केला.

3 house burglaries in Sawada in 1 night jalgaon
Nashik Crime : ओढणीच्या सहाय्याने प्रियसीचा गळा आवळून खून; 6 तासांतच प्रियकर ताब्यात

यासोबतच याच परिसरात आणखी दोन ठिकाणी चोरी झाल्या आहेत. भागवत टिकाराम कोळंबे यांचे स्वामीनारायण नगर येथील घर, तर वैभव बळीराम महाजन यांच्या केळी ग्रुपमध्ये देखील चोरी झाली आहे.

या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील तपास करीत आहेत.

3 house burglaries in Sawada in 1 night jalgaon
Crime News: नंग्या तलवारी नाचवत दोन जणांवर प्राणघातक हल्ला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com