Jalgaon Crime News : यावलला 3 घरफोड्या संशयित आरोपीस अटक

crime
crime esakal

Jalgaon Crime News : चोपडा रस्त्यावरील वढोदे (ता. यावल) गावाजवळील एका कृषी केंद्रात, तर शहरातील विरारनगर व मदिनानगर परिसर अशा तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या.

कृषी केंद्रातील चोरीत सहभागी अज्ञात चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. (3 house burglary suspects arrested in yawal jalgaon crime news )

यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात विरारनगर परिसरात मध्यप्रदेशातील संशयितास अटक केली.

शहरातील हरिओमनगर शेजारी मदिनानगर परिसरातील रहिवासी रफीक खान नामदार खान (वय ५५) हे खासगी शाळेत शिपाई म्हणून नोकरीस आहेत.

त्यांनी शहरातील विस्तारित भागात आपल्या सून व मुलासाठी भाडे तत्त्वावर घर घेतले. १ ते २ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीस घरातील मंडळी ही बाबुजीपुरा येथील घरात झोपण्यासाठी गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लाकडी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

crime
Jalgaon Crime News : विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच उचलले टोकाचे पाऊल

दुसऱ्या घटनेत शहरातील विरारनगरमधील रहिवासी पुष्पा विजय अहिरराव यांच्या घरचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरून नेली.

यावलमधील रहिवासी माजी नगराध्यक्ष दीपक रामचंद्र बेहेडे यांच्या वढोदे जवळील कृषी केंद्राच्या मुख्य द्वाराचे कुलूप तोडून १० ते २० हजार रुपये किमतीचे कृषी साहित्य चोरून नेले.

केंद्रातील चोरीचा प्रकार हा सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके तपास करीत आहेत.

crime
Jalgaon Crime News : मुलीची छेड काढून चॉपरने धमकावले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com