नोकरीचे आमिष दाखवत ‘बंटी-बबली’ने लाटले साडेतीन लाख

मोबाईलवर बनावट नियुक्तिपत्राची प्रत टाकून हे दांपत्य अतिरिक्त दीड लाख रुपये उकळण्याच्या प्रयत्नात असताना, फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
 fraud
fraudsakal
Updated on

जळगाव : शहरातील देवेंद्रनगरातील गृहस्थाला मध्य प्रदेशातील छिंदवाडा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला लावून देतो, असे सांगत एका दांपत्याने चक्क साडेतीन लाखांत फसवणूक केली आहे. मोबाईलवर बनावट नियुक्तिपत्राची प्रत टाकून हे दांपत्य अतिरिक्त दीड लाख रुपये उकळण्याच्या प्रयत्नात असताना, फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील वैद्यकीय महाविद्यालयात तुम्हाला क्लार्क म्हणून कायम नोकरीला लावून देतो, असे आमिष देत उमेश राजेंद्रप्रसाद चौरसिया (वय ३७, रा. देवेंद्रनगर, जळगाव) यांची ३ लाख ५० हजार रुपयांत फसवणूक करण्यात आली. मध्य प्रदेशातील शिवशंकर लखन जवरकर, नितू जवरकर (रा. दोन्ही चांदामोटा, वॉर्ड १०, क्रांती चौक, छिंदवाडा) अशी फसवणूक करणाऱ्या दांपत्याची नावे आहेत. जळगावात येऊन या दांपत्याने उमेश चौरसिया यांच्याकडून साडेतीन लाख रुपये रोख घेऊन नोकरीची खात्री दिली. थोड्या दिवसांनी चौरसिया यांच्या मोबाईलवर बनावट नियुक्तिपत्र पाठवून संबंधितांनी आणखी दीड लाखांची मागणी केली. मात्र, चौरसिया यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केल्यावर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. चौरसिया यांच्या तक्रारीवरून शिवशंकर व नितू जवरकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 fraud
जळगाव : चोरट्यांनी शेततळ्यातील प्लास्टिक पेपर चोरला

पाच लाखांत ठरला सौदा

चौरसिया यांच्या तक्रारीनुसार ‘बंटी-बबली’ जवरकर दांपत्याने नोकरी लावून देण्यासाठी ५ लाख मागितले होते. त्यासाठी त्यांच्याशी झालेले संभाषण, व्हॅाटस्ॲप चॅटींग आणि त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाबाहेरील फोटो दाखविले होते, अशा सर्व पुराव्यासंह माहिती पोलिसांना दिली आहे.

 fraud
Jalgaon : बॅंक लुटण्याच्या प्रयत्नातील संशयित ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com