Jalgaon : औषध विक्रेत्याला साडेतीन लाखांत गंडवले

विश्वास संपादन करून दोघांनी वेळोवेळी औषधी खरेदी करून मोठा गंडा घातला.
fraud
fraudesakal
Updated on

जळगाव : जिल्‍ह्‍यातील होलसेल औषध व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून दोन जणांनी वेळोवेळी औषधी खरेदी करून सुमारे ३ लाख ६७ हजार रूपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील रामदास भंगाळे (५४, रा. ओंकारनगर, जळगाव) हे कुटुंबियांसह राहत असून मेडिकल व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. भंगाळे डिस्ट्रीब्यूटर नावाने त्यांचे होलसेल औषध विक्रीचे दुकान आहे. जळगावातील जिल्हा न्यायालयाजवळील शाहू महाराज हौऊसिंग सोसायटीत मॅक्स मेडिको हे दुकान चरणसिंग जयसिंग चव्हाण आणि मोहम्मद हानिफ शेख मेहबुब हे दोघे भागीदारीने चालवितात. भंगाळे डिस्ट्रीब्यूटरचे मालक सुनील भंगाळे यांचा विश्वास संपादन करून दोघांनी वेळोवेळी रोखीने व्यवहार केला. त्यानंतर उधारीने औषधी घेण्यास सुरूवात केली. नियमितपण उधारीने घेतलेले औषधांची एकुण ३ लाख ६८ हजार रूपये दोघांकडून येणे बाकी होते. सुनील भंगाळे यांनी उधारीची रक्कम दोघांकडे मागितली असता त्यांनी १५ ऑगस्ट २०२१ ला १ लाख ८८ हजार ६३३ रूपयांची धनादेश दिला. हा धनादेश मात्र, बँकेत वटवला गेला नाही. त्यावर रक्कम नमुद करण्याची मागणी सुनील भंगाळे यांनी चरणसिंग जयसिंग चव्हाण आणि मोहम्मद हानिफ शेख मेहबूब यांच्याकडे केली. दोघांनी भंगाळे यांची वेळ मारून नेली. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी केली असता दोघांनी आपण असा कोणता माल तुमच्याकडून घेतलाच नाही असा बनाव केला व रक्कम देण्यास नकार दिला. सुनील भंगाळे यांनी पुन्हा दोघांची भेट घेऊन उधारीच्या पैशांची मागणी केली असता दोघांनी शिविगाळ, दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनील भंगाळे यांनी मंगळवारी (ता.२८) जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. सुनील भंगाळे यांच्या फिर्यादीवरून चरणसिंग जयसिंग चव्हाण आणि मोहम्मद हानिफ शेख मेहबुब यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप चंदेलकर तपास करीत आहे.

fraud
किशोर आप्पा परत या..! उपजिल्हाप्रमुखाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल
fraud
Success Story : अर्चितच्या ‘पीपीई कीट’ला भारतीय पेटंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com