
पुन्हा 3 मोटारसायकली लंपास; वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
जळगाव : जळगाव शहरातून सोमवारी (ता. २७) तीन मोटारसायकल चोरुन (Bikes Theft) नेल्याचे तीन स्वतंत्र गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. यात गांधीनगरातील नटराज सिनेमा जवळून एक, शाहुनगरातून दुसरी आणि वसंतवाडी येथून तिसरी मोटारसायकल चोरट्यांनी चोरुन नेल्याप्रकरणी तीन पोलिस ठाण्यात गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहे. (3 motorcycle stolen Crimes filed in different police stations Jalgaon Crime News)
हेही वाचा: ‘शिंदेसाहेब, आमच्या पक्षात सामील व्हा’; मानव एकता पक्षाची खुल्ली ऑफर!
जिल्हापेठ पोलिसांत दाखल गुन्ह्यातील तक्रारदार नितीन रामेश्वरलाल जागीड (वय २३, रा. वाघनगर), रविवारी सकाळी १० वाजता दुचाकीवरून (एमएच १९ बीव्ही ८७०२) नटराज सिनेमाजवळ आला होता, दुचाकी उभी केलेल्या जागेवरून चोरट्यांनी चोरुन नेली. शेख जावेद शेख चाँद (वय ३३, रा.चोपडा) गुरुवारी (ता. २३) शाहूनगर येथील फॉर्च्युन फायनान्स येथे आले होते. त्यांची पार्किंगमध्ये उभी असलेली (एमएच १९ बीएल ०१७२) दुचाकी चोरुन नेल्याचे आढळून आले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तर, अरुण काशिदास जगताप-सोनार (वय ५३, रा. वसंतवाडी) यांच्या मालकीची होंडा शाईन (एमएच १२ टीजी २६३०) घरासमोरून चोरट्यांनी चोरुन नेली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक युनूस तडवी, मिलिंद सोनवणे, गजानन बडगुजर करत आहेत.
हेही वाचा: नाशिक : प्रतीकात्मक अंत्ययात्रेतून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
Web Title: 3 Motorcycle Stolen Crimes Filed In Different Police Stations Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..