
हतनूर धरणाचे 30 दरवाजे उघडले!
जळगाव : दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येत आहे. त्यामुळे हतनूरचे ३० दरवाजे उघडण्यात आले. (Latest marathi news)
हेही वाचा: रस्त्यांची झाली चाळणी; पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कामांचा दर्जा उघड
मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थान परिसरात तसेच विदर्भातही पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा वाढला आहे. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्याने हतनूर धरणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे धरणाचे सकाळी ११ वाजेपर्यंत ३० दरवाजे प्रत्येकी एका मीटरने उघडण्यात आले. त्यातून ४२ हजार ३०० क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने रात्री केवळ २४ बंद करून ६ दरवाजातून साडेआठ हजार क्युसेकने विसर्ग सुरु होता. प्रशासनाच्यावतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा: अधिकारी, कर्मचाऱ्यांना झटका विविध कारणांमुळे पोलिस आयुक्तांकडून कारवाई
Web Title: 30 Gates Of Hatnur Dam Opened Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..