जळगाव जिल्ह्यातील ३० ग्रा.पं. कार्यालय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करा ; गुलाबराव पाटील

ग्रामविकास विभागाचे निर्देश : पालकमंत्र्यांचा पुढाकार
गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटीलsakal

जळगाव : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायतींना नूतन वास्तू मिळाव्यात, यासाठीचा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास खात्याकडे पाठविला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या ३० ग्रामपंचायतींसाठी नवीन वास्तू मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

यात सुधारित निकषांसह जिल्हा परिषदेने या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले असून जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायतींना नवीन इमारती मिळण्याच्या हालचाली यामुळे गतिमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे आपापल्या तालुक्यांमधील ज्या ग्रामपंचायतीच्या वास्तू मोडकळीस आल्या वा खराब झालेल्या आहेत. त्यांचे नूतनीकरण करून मिळावे, यासाठी मागणी केली होती. या अनुषंगाने पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश देऊन याबाबतचे प्रस्ताव ग्रामविकास खात्याला पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर आता ग्रामविकास खात्याने ग्रामपंचायतीच्या नवीन वास्तूंसाठी सुधारित निकष जारी केले आहेत.

या आहेत तीस ग्रामपंचायती

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण, भवाळे, कृष्णापूर, हातेड, सुटकार. रावेर तालुक्यातील चिनावल, सहस्त्रलिंग, उटखेडा. यावल तालुक्यातील पिलोदे, अट्रावल. जळगाव तालुक्यातील विदगाव व तुरखेडा, धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम, रेल, रोटवद. अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज.म, निंभोरा, रणाईचे, बाम्हणे. पारोळा तालुक्यातील अंबापिंप्री, उंदीरखेडा, तरडी व विचखेडा. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव, खडके खुर्द. पाचोरा तालुक्यातील वाणेगाव, वरखेडी, दिघी, हनुमानवाडी, वडगाव बु. प्र. प्रा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com