
जळगाव : फुलपाट टाकळी (ता. धरणगाव) येथील ३० वर्षीय तरुणाने बांभोरी गावाजवळील गिरणा नदीच्या पुलावरून गुरुवारी (ता. ६) सायंकाळी उडी घेऊन आत्महत्या केली.
फुलपाट ग्रामस्थांनी मृतदेहाची ओळख पटविली असून, श्याम प्रताप भिल (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. (30 years youth committed suicide by jumping from Girna river bridge jalgaon news)
श्याम भिल हा त्याचा भाऊ भुरा भिल याच्यासोबत राहत होता. तो वाळूच्या ठेक्यावर काही महिन्यांपूर्वी काम करीत होता. पत्नीच्या मृत्यूनंतर श्याम भिल तणावात होता. त्यामुळे गुरुवारी बांभोरीजवळील पुलावरून त्याने थेट गिरणा नदीपात्रात उडी घेतली. पुलावरून उडी घेण्यापूर्वी प्रत्यक्षदर्शी दोघांनी त्याला हटकले होते.
मात्र, आत्महत्येचा निर्धार पक्का असल्याने त्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुलावरून थेट उडी घेतली. हा प्रकार वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बांभोरी ग्रामस्थांनी तालुका पोलिसांना कळविले.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
त्यावरून पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार अनिल फेंगडे, चेतन पाटील, होमगार्ड अशोक वाघ यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
वाळूवाल्यांनीच ओळखले
नदीपात्रातच वाळू ठेक्यांवर काम करीत असल्याने श्याम भिल यांची ओळख वाळू व्यवसायिक, वाहतुकदारांनी पटविली व पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामस्थांना बोलावून त्याची खात्री करून घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.