Jalgaon Crime News : कुंटणखाना प्रकरणात चौघांना कोठडी; तरुणींची शासकीय सुधारगृहात रवानगी

Jalgaon Crime News : कुंटणखाना प्रकरणात चौघांना कोठडी; तरुणींची शासकीय सुधारगृहात रवानगी

Jalgaon Crime News : बसस्थानकाजवळ चोपडा मार्केट परिसरातील हॉटेल लय भारी येथे पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा मारून व्यवस्थापकासह तीन कामगारांना अटक केली होती. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, मुली पुरविणारा पाचवा संशयित मात्र फरारी आहे. या प्रकरणात पोलिसांनी पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, सुरत येथील पाच तरुणींना ताब्यात घेतले असून, त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. (4 in custody in Kuntankhana crime case jalgaon news)

सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात, हॉटेल लय भारी येथे कुंटणखाना चालविला जात असल्याचे आढळून आले होते.

पोलिसांनी एजंट पाठवून हा छापा टाकत हॉटेलचा व्यवस्थापक सागर बापू बहिरे (वय २८, रा. तिसगाव, ता. देवळा, जि. नाशिक) याच्यासह सोमनाथ बबन पवार (२२, रा. उमराणा, ता. देवळा, जि. नाशिक), जयेश ऊर्फ पाचा देवीदास तायडे (२७, रा. हरिओमनगर, आसोदा रोड, जळगाव), किरण विजय सुरवाडे (३०, रा. तांबापुरा, जळगाव) या कामगारांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Crime News : कुंटणखाना प्रकरणात चौघांना कोठडी; तरुणींची शासकीय सुधारगृहात रवानगी
Jalgaon Crime News : बालसुधारगृहातील 10 वर्षीय बालकावर अत्याचार

तसेच, पोलिस कारवाईत पश्‍चिम बंगालमधील दोन, उत्तर प्रदेशातील एक, तसेच सुरत व ठाणे येथील प्रत्येकी एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व महिलांची रवानगी सरकारी महिला वसतिगृहात करण्यात आली.

दरम्यान, गुन्ह्याचा मास्टरमाइंड तथा मुली पुरविणारा पाचवा संशयित प्रवीण आहेर हा फरारी असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल तपास करीत आहेत.

Jalgaon Crime News : कुंटणखाना प्रकरणात चौघांना कोठडी; तरुणींची शासकीय सुधारगृहात रवानगी
Jalgaon Crime News : झंडू बाम, आयोडेक्स, ईनो, हार्पिकचा नकली माल जप्त; साडेसहा लाखांचा ऐवज जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com