
आमदगावात धाडसी चोरी; 4 लाखांचे सोने, लाखाची रोकड लंपास
बोदवड (जि. जळगाव) : तालुक्यातील आमदगाव येथे चोरट्यांनी घरफोडी केली. चार लाखांचे सोने व कपाटात ठेवलेले एक लाखाची रोकड, असे एकूण पाच लाख रुपयांची धाडसी चोरी केली.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडू पाटील यांच्या घरांना दोन दरवाजे आहेत. कुटुंबीयांसह ते समोरच्या दरवाजासमोर झोपले होते. चोरट्यांनी मागील दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला व दागिने व रोकड पसार झाले. याबाबत गोविंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एपीआय अंकुश जाधव तपास करीत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी जळगाव येथील डॉग स्कॉट आणण्यात आले होते. त्याने गावाबाहेर दोन किलोमीटरचा नांदगाव रस्ता दाखवला. जळगाव येथील ठसे तज्ज्ञ व फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा: आईच्या शेतावरून पेटली भावंडात ‘भाऊबंदकी’; नातवाने गमावले प्राण
हेही वाचा: घोडसगावजवळ अपघात; शुक्रवारची पहाट मजुरांसाठी बनली काळ
Web Title: 4 Lakh Gold 1 Lakh Cash Theft In Amadgaon Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..