घोडसगावजवळ अपघात; शुक्रवारची पहाट मजुरांसाठी बनली काळ

अपघात
अपघातesakal

मुक्ताईनगर (जळगाव) : शुक्रवारची पहाट दुधाचे टँकर महामार्गावरच खाली करणाऱ्या मजुरांचा काळ बनून आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घोडसगाव गावाजवळ अपघातग्रस्त दुधाच्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध टाकण्याची प्रक्रिया सुरु असताना फरशी वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रकने मागून येऊन क्रेनला व दुधाच्या टँकरला जोरदार धडक दिली. यात पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात अन्य पाच जण जखमी झालेत.

गुरुवारी (ता.१२) रात्री दूध घेऊन धुळ्याकडून मलकापूरकडे जाणारा टँकर हा घोडसगाव शेती शिवारातील रमाकांत वासुदेव चौधरी यांच्या शेताजवळ बंद पडला होता. त्यातील दूध खराब होऊ नये म्हणून चालकाने तत्काळ संबंधित विभागाची संपर्क साधून दुसरे टँकर मागवले. अपघातग्रस्त टँकरमधून (No. GJ02 VV 8887) दुसऱ्या टँकरमध्ये (No. GJ02 XX 9759) दूध भरत असताना क्रेनला देखील सज्ज ठेवण्यात आले होते.

असा घडला अपघात
दूध दुसऱ्या टँकरमध्ये हलविण्याचे काम सुरू असतानाच भरधाव वेगाने टाइल्स भरलेल्या मोठ्या मालवाहतूक ट्रकने (No. GJ 36 8939) दोन्ही टँकर आणि क्रेनला जबरदस्त धडक दिली.

कामगारांवर काळाचा घाला
या भीषण अपघातात बंद पडलेल्या टँकर मधील तीन जण टँकर चा मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चार जण धुळे जिल्ह्यातील तर एक जण जळगाव जिल्ह्यातील आहे.

- मृतांत धुळ्याचे चौघे
- जळगावच्या एकाचा समावेश
- अन्य पाच जण गंभीर जखमी

मृतांची नावे अशी
पवन सुदाम चौधरी (वय २५, राहणार धुळे), धनराज बन्सीलाल पाटील (वय ४१, रा. नगाव जिल्हा धुळे), धनराज सुरेश सोनार (वय ३७, राहणार शिवाजीनगर जळगाव), उमेश राजेंद्र सोळंके (वय ३५, राहणार देवपूर जिल्हा धुळे), भालचंद्र गुलाब पाटील (वय ३१, राहणार भिलाडी जिल्हा धुळे) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये विजय अनिल पाटील (वय २६, बिलाडी, धुळे) या फिर्यादी व दूध डेअरीवरील कामगारांसह मुरलीधर प्रल्हाद कावरे (रा. नशिराबाद, जळगाव), चालक अजित ऊर्फ गुड्डू हरिशंकर यादव (वय ३५, रा. उत्तरप्रदेश), परवेझ खान तरबेज खान (वय २८, रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश), कांतिलाल शांतिलाल ठाकरे (वय
४३), ओम गेंदीलाल ठाकरे (वय १४, दोन्ही रा. जळगाव) यांचा समावेश आहे.

जखमींना तातडीने मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालय व नंतर गोदावरी हॉस्पिटल, साकेगाव येथे हलविण्यात आले. याप्रकरणी विजय अनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक अलाभाई पद्माभाई लुना (रा. जामनगर, गुजरात) याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अपघात
बीड : राष्ट्रीय महामार्ग बनतोय जीवघेणा

मृतदेहांचे विदारक चित्र
हा अपघात भयानक होता. त्यात मृत झालेल्या मजुरांचे मृतदेह विदारक स्थितीत छिन्नविछिन्न पडलेले होते. गावालगतच्या लोकांनी टँकर, ट्रकच्या पत्र्यातून मृतदेह व जखमींना बाहेर काढले. अपघाताचे वृत्त कळताच पोलिस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, मुक्ताईनगर ठाण्याचे निरीक्षक श्री. शेळके, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल बोरकर आदींनी भेट देऊन पाहणी केली.

अपघात
सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com