Latest Jalgaon News | हिवाळी पाहुण्यांसह 45 प्रजातींचे पक्षी; गाढेगावातील ओढ्यावर नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samanya Dhivar

Jalgaon : हिवाळी पाहुण्यांसह 45 प्रजातींचे पक्षी; गाढेगावातील ओढ्यावर नोंद

जळगाव : पक्षी सप्ताहानिमित्त निसर्गमित्र जळगावतर्फे शुक्रवारी (ता. ११) गाडेगाव येथील ओढ्यावर ग्रामीण युवकांसाठी पक्षी निरीक्षण कार्यक्रम झाला. यात हिवाळी पाहुण्यांसह ४५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली.

दर वर्षी निसर्गमित्र जळगावतर्फे वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन व पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताह साजरा होतो. यानिमित्त या वर्षी गाढेगाव येथील ओढ्यावर ग्रामीण युवकांसाठी पक्षी निरीक्षण कार्यक्रम झाला. (45 species of birds including winter visitors Note on stream in Gadhegaon Latest Jalgaon News)

निसर्गमित्रचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी उपस्थित ग्रामीण युवकांना पक्षी सप्ताहाबद्दल माहिती दिली. तसेच फिल्ड गाइडच्या माध्यमातून पक्ष्यांची ओळख करून दिली. पक्षी निरीक्षणात वैभव बऱ्हाटे, मनीष भारंबे, योगेश बरऱ्हाटे, दीपक पाटील, जयेश धांडे, नारायण

वराडे, रितेश पाटील, नितीन शिनगारे, श्रावण नेहेते, बाळू महंगडे या युवकांनी सहभाग घेतला. राजेंद्र गाडगीळ यांनी आभार मानले.

हेही वाचा: Yellow- Footed Green Pigeon : दुर्मिळ हरियाल पक्ष्यांचे निफाडला दर्शन

हळद्या

हळद्या

या पक्ष्यांची झाली नोंद

पक्षी निरीक्षणादरम्यान पांढऱ्या भुवईचा धोबी, पांढरा धोबी, करडा धोबी, पिवळा धोबी, गुलाबी मैना, दगडी गप्पीदास, काळा थीरथिरा, श्वेत कंठी, तपकिरी आशियाई माशीमार, सामान्य तुतारी या हिवाळी पाहुण्यांची नोंद करण्यात आली. यासोबत सामान्य धीवर (खंड्या), पाणकावळा, पांढऱ्या

छातीचा धीवर (खंड्या), लाजरी पाणकोंबडी, राखी वटवट्या, कोकीळ, तांबट, कोतवाल, कावळा, बुलबुल, मैना, सुभग, हळद्या, वेडा राघू, पोपट, होला, दयाळ, सातभाई, गाय बगळा, छोटा बगळा, वंचक, खाटीक नाचण, आलेक्झेंडर पोपट आदी ४५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

पांढरा धोबी

पांढरा धोबी

हेही वाचा: Blue-Cheeked Bee-Eater : निळ्या गालाच्या वेडा राघूचे ‘नांदुरमधमेश्‍वर’मध्ये प्रथम दर्शन!