Yellow- Footed Green Pigeon : दुर्मिळ हरियाल पक्ष्यांचे निफाडला दर्शन

Green birds sitting on the tree at niphad
Green birds sitting on the tree at niphadesakal

निफाड (जि. नाशिक) : राज्यपक्षी म्हणून ओळख असलेल्या हरियाल पक्ष्यांचे दर्शन निफाड येथे होवू लागले आहे. निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्‍वर येथे रामसर दर्जा प्राप्त असलेले पक्षी अभयारण्य आहे. याठिकाणी दरवर्षी हंगामात हजारो किलोमीटरचा प्रवास करत देश विदेशातील पक्षी अभयारण्यात येत असतात. ( Sighting of rare Yellow Footed Green Pigeon in Niphad Nashik News)

Green birds sitting on the tree at niphad
Nashik : ZPच्या नव्या CEOना निवासस्थानाची प्रतीक्षा!

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून भारतासह विदेशी पक्षी नांदुरमध्यमेश्‍वर येथे दाखल होत आहे. याचवेळी महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळख असलेल्या आणि नाशिक जिल्ह्यात वास्तव्यास नसलेल्या हरियाल पक्ष्याचे दर्शन येथील पक्षी निसर्ग मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ उत्तम डेर्ले यांनी झाले आहे. निफाड शहरातून सकाळी फेरफटका मारत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील पिंपळाच्या झाडावर त्यांना हरियाल पक्ष्यांचा थवा दिसून आला.

हरियाल पक्षी खासकरून उत्तर भारतात मोठ्या संख्येने आढळतात. यासह मध्य भारतातील महाराष्ट्राचा काही भाग सोडता , गुजरात, पश्‍चिम बंगला, राजस्थान, पंजाब, आणि आसाम येथील पक्षी अभयारण्यात याची संख्या मोठी आहे. हा पक्षी कबुतरासारखा आहे या पक्षाचे मान, छाती, पोट, पाय व चोच पिवळी तर पंख हिरवट राखी रंगाचे असतात.

"मागील दहा ते बारा वर्षापासून नाशिक जिल्ह्यात हरियाल पक्षी दिसून आलेला नाही. ताडोबाच्या जंगलात यांची संख्या काहीशी आहे. हरियाल पक्षी खासकरून वड , उंबर,अंजीर, पिंपळाच्या झाडावर राहतात व झाडावर पोपटासारखे उलटे टांगून फळ खातात. हे पक्षी थव्यांमध्ये राहतात." -डॉ. उत्तम डेर्ले.

Green birds sitting on the tree at niphad
Bharat Jodo Yatra : नांदेडला भारत जोडो यात्रेत नाशिकचे पदाधिकारी सामील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com