जळगाव : सामाजिक विषयांवर तरुणाईचा कल्पनाविष्कार

लेखी, मौखिक परीक्षेसह मतदानातून निवड; जिल्ह्यात ‘यिन’ निवडणुकीचा जल्लोष
yin
yinsakal

जळगाव : जिल्ह्यात आज ‘सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’(yin) अर्थात, यिनच्या जिल्हाध्यक्ष व अन्य पदांची निवडणूक(yin election) आज उत्साहात पार पडली. लेखी परीक्षेत उमेदवारांनी देशाच्या आर्थिक, सामाजिक, कोरोनाविषयक बाबींचा ऊहापोह केला. तर मौखिक परीक्षेतून त्यांच्यातील विषयांची जाण व नेतृत्वगुणांचा आविष्कार समोर आला.या निवड प्रक्रियेतून टॉपर ठरलेल्या उमेदवारांमधून लोकशाही पद्धतीनुसार मतदानाने जिल्ह्यातील चार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात महाविद्यालयीन अध्यक्षांमधून जिल्हाध्यक्षपदी सयाजी जाधव, शहराध्यक्षपदी राधिका पल्लीवाल यांची तर महाविद्यालयीन उपाध्यक्षांमधून महापौरपदी पवन पाटील व जि. प. अध्यक्ष म्हणून हर्षाली जाधव यांची बहुमताने निवड करण्यात आली. (sakal media group yin election completed for president or vice president in jalgaon)

yin
जळगाव : २८० फूट संडे-१ सुळका केला सर

दुपारपासून उत्साह

‘सकाळ’च्या(sakal) एमआयडीसीतील प्रांगणात आज दुपारी १२ पासून निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळपासूनच या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत होता. सकाळी साडेबारापासून उमेदवारांची नोंदणी सुरू झाली. अध्यक्ष व उपाध्यक्षांची स्वतंत्र नोंदणी करण्यात आली.

yin
...अन्‌ गुलाबराव पाटील कीर्तनाला उभे राहिले!

अशी झाली परीक्षा

उमेदवारांची लेखी व मौखिक परीक्षेद्वारे कसोटी तपासण्यात आली. ६० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ७ प्रश्‍नांपैकी ६ प्रश्‍नांची उत्तरे लिहायची होती. मौखिक परीक्षा ४० गुणांची, असे एकूण १०० गुणांपैकी उमेदवारांना गुण देण्यात आले. नोंदणी केलेल्या उमेदवारांत अध्यक्ष व उपाध्यक्षांमधून प्रत्येकी ४ असे ८ टॉपर उमेदवार (परीक्षांच्या गुणांच्या आधारे) निवडण्यात आले. अध्यक्षांमधून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या सयाजी जाधव, राधिका पल्लीवाल, रुचिका इंळे व सागर सोनवणे यांची तर उपाध्यक्षांमधून देवयानी बोराडे, पवन पाटील, हर्षाली धनगर, गिरीराज कंखरे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षांमधून निवड केलेल्या चार उमेदवारांमधून मतदान घेऊन जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडण्यात आले, तर उपाध्यक्षांमधून निवड झालेल्या चौघांमधून मतदान घेऊन महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष घोषित करण्यात आले. निवड जाहीर होताच उमेदवारांनी विजयी जल्लोष केला. निवडणूक प्रक्रियेत परीक्षा देऊन सहभागी झालेले अन्य उमेदवार जिल्हा सचिव म्हणून तर ग्रामीण भागातील उमेदवार जिल्हा संघटक म्हणून ‘यिन’च्या टीममध्ये काम पाहतील.

‘सकाळ-यिन’तर्फे घेण्यात आलेली ही निवडणूक लोकशाही पद्धतीने अत्यंत नियोजनबद्ध पार पाडण्यात आली. या व्यासपीठातून तरुणांना नेतृत्वाची चांगली संधी मिळते. यातून त्यांचे नेतृत्व विकसित होऊन ते भविष्यात कोणत्याही क्षेत्रात चांगले काम करू शकतील, असा विश्‍वास आहे. - प्रा. डॉ. शमा सराफ, निवडणूक निर्णय अधिकारी

yin
अकरावी सायन्सला प्रवेश मिळाला नाही, तरीही प्रतीक्षा बनली अधिकारी!

‘सकाळ-यिन’तर्फे घेण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया आम्ही अत्यंत पारदर्शी पद्धतीने घेतली आहे. जे विद्यार्थी निवडून आले त्यांचे अभिनंदन. परंतु जे निवडून आले नाहीत त्यांनी निराश न होता ‘यिन’च्या एकूणच टीमवर्कमध्ये योगदान दिले पाहिजे - प्रा. विजेता सिंग, परीक्षक, यिन निवडणूक प्रक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com