MLA Kishor Patil : पाचोरा -भडगाव मतदारसंघातील पाचोरा व भडगाव शहर, तालुक्यात रस्ते काँक्रिटीकरण, रस्ते डांबरीकरण, व्यापारी संकुल व तलाठी कार्यालय बांधकाम, मोरी, पाइप मोरी, नळकांडी पूल, अमेरिकन व जर्मन अभ्यासक्रमावर आधारित अंगणवाडी रचना आदी विकासकामांसाठी ४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामांना प्राधान्याने पूर्णत्वास नेण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (49 crore sanctioned for Pachora Bhadgaon jalgaon news)
कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, शरद पाटे, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शहराध्यक्ष किशोर बारवकर, उपसभापती पी. एन. पाटील, अरुण तांबे, प्रवीण पाटील, प्रवीण ब्राह्मणे आदी उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन पाचोरा व भडगाव तालुक्यासह शहरात सुमारे ४९ कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून पालिका, सार्वजनिक बांधकाम, गौण खनिज योजनेंतर्गत ही कामे होणार असल्याचे स्पष्ट केले. यात पाचोरा शहर व तालुक्यासाठी ३८ कोटी तर भडगाव तालुक्यासाठी ११ कोटींची विकासकामे आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यात पाचोरा तालुक्यातील संघवी कॉलनी, दामजीनगर, हनुमाननगर, राष्ट्रीय महामार्ग जोड रस्ता, प्रभाग तीनमधील रस्ते, पुनगाव रोड, चिंतामणी कॉलनी, जिजामाता कॉलनी, स्वामी समर्थनगर, कृष्णापुरी, प्रेमनगर, शासकीय विश्रामगृह, पंचमुखी हनुमान चौक, पवननगर, स्वामी समर्थनगर, अरिहंत नगर, विकास कॉलनी, गांधीनगर येथे रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे तसेच पालिकेच्या थेपडे व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्यावर व्यापारी गाळे बांधकाम ही कामे पालिकेंतर्गत मंजूर झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाचोरा तलाठी कार्यालय बांधकाम, शेवाळे-खडकदेवळा, नगरदेवळा- गाळण रस्त्यावर पूल, बाळद- लोहटार रस्त्यावर पुलाची पुनर्बांधणी, कोल्हे-आंबेवडगाव, दुसखेडा- परधाडे, पाथर्डी- घुसर्डी रस्त्यावर पूल बांधणे,
होळ फाटा येथे मोरी, दहिगाव संत गावाजवळ मोरी तसेच गौण खनिज योजनेंतर्गत पुनगाव, जारगाव येथे कॉंक्रिटीकरण, महादेवाचे बांबरुड येथे नळकांडी पूल, अंतुर्ली खुर्द, वाणेगाव, चिंचखेडा येथे कॉंक्रिटीकरण, निंभोरी तांडा ते सुकळेश्वर रस्त्यावर मोरी, राजुरी बुद्रुक व खुर्द, आसनखेडा बुद्रुक व खुर्द, तारखेडा बुद्रुक, शिंदाड येथे रस्ता काँक्रिटीकरण, टाकळी ते कजगाव नदीवर नळकांडी पुलाचे बांधकाम, नांद्रा, वडजी, होळ, अंतुर्ली बुद्रुक, नेरी वाणेगाव, खडकदेवळा, शिंदाड, तारखेडा बुद्रुक, गाळण खुर्द, आंबेवडगाव वरखेडी, वडजी, वडगाव, कोठली, शिवनी व आडळसे येथे अमेरिकन व जर्मन धरतीवर आधारित अंगणवाडी खोल्यांचे करणे या कामांना मंजुरी मिळाली आहे.
भडगाव तालुक्यात पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ११ कोटींची कामे होणार असून, त्यात पालिकेच्या प्रभाग ३ मध्ये वडधे फाटा ते जुने वडधे रस्त्याचे कॉंक्रिटीकरण तसेच भडगाव येथे तलाठी कार्यालय बांधकाम, पारोळा- तरवाडा रस्त्यावर पूल, तरवाडे - पळासखेडे रस्त्यावर मोरी, वाडे -कनाशी तसेच खेडगाव- जुवार्डी रस्त्यावर पुलाचे बांधकाम, अशा ४९ कोटी खर्चाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
खतप्रकरणी मुख्यमंत्र्यांना साकडे
बनावट खत प्रकरणासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले, की खत तयार करणाऱ्या कंपनीलाच याबाबत दोषी धरण्यात यावे. मुख्य वितरक अथवा कृषी केंद्र चालकांचा यात कोणताही दोष नसतो.
यासंदर्भात समिती गठित करण्यात येऊन कायदा करण्यात येणार आहे. त्यात व्यापारी प्रतिनिधी घेण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.