Jalgaon News: दिवाळीपूर्वी 54 हजार शेतकऱ्यांना मिळणार फळपीक विम्याचा लाभ

 54 thousand farmers will get benefit of fruit crop insurance before Diwali jalgaon news
54 thousand farmers will get benefit of fruit crop insurance before Diwali jalgaon newsesakal

Jalgaon News : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२ मध्ये एकूण ७८ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता.

त्यातील प्रलंबित असलेल्या ५४ हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच येत्या ४ ते ५ दिवसांत थेट बँक खात्यात पीकविम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. (54 thousand farmers will get benefit of fruit crop insurance before Diwali jalgaon news)

पीकविमा उतरविलेल्या एकूण ७८ हजार शेतकऱ्यांपैकी ५४ हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळणार असून, ११ हजार शेतकऱ्यांनी पीक न लावता विमा घेतला असल्याचे तसेच १३ हजार शेतकऱ्यांनी अधिकचा म्हणजे लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढलेला असल्याचे पीकविमा कंपनीच्या सर्वेक्षणात आढळून आले असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

तसेच ज्यांनी योग्य पद्धतीने विमा उतरविलेला असून, त्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील कृषी कार्यालय येथे सर्व पुराव्यासह अर्ज सादर करावा, अशी माहिती खासदार खडसे यांनी दिली.

 54 thousand farmers will get benefit of fruit crop insurance before Diwali jalgaon news
Padalse Project : राज्यकर्त्यांच्या उदासीनतेने ‘पाडळसे’चा बळी; 3 दशके वर्षे रखडला महत्त्वाकांक्षी प्रकल्प

केळी विमा पात्र महसूल मंडळे

रावेर- खिर्डी बुद्रूक, खिरोदा, निंभोरा बुद्रूक, सावदा, रावेर, खानापूर, ऐनपूर

चोपडा- अडावद, लासूर, धानोरा प्र.चोपडा, गोरगावले, हातेड बुद्रूक, चहार्डी

मुक्ताईनगर- घोडसगाव, अंतुर्ली, कुऱ्हा, मुक्ताईनगर

यावल- भालोद, साकळी, किनगाव बुद्रूक, बामणोद, यावल, फैजपूर.

भुसावळ- वरणगाव, पिंपळगाव खुर्द, भुसावळ

जामनेर- नेरी, शेंदुर्णी, मालदाभाडी, जामनेर, पहूर

 54 thousand farmers will get benefit of fruit crop insurance before Diwali jalgaon news
Padalse Project: लाभक्षेत्रातील 85 टक्के भाग अवर्षणग्रस्त असल्याने प्रकल्पाची भासतेय आवश्‍यकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com