Milk Adulteration Crime : दूध भेसळीविरोधात 7 खटले दाखल; जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून धडक मोहिम

7 cases filed against milk adulteration in jalgaon news
7 cases filed against milk adulteration in jalgaon newsesakal

Milk Adulteration Crime : जिल्ह्यातील दूधात व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून १ सप्टेंबरपासून दूध भेसळी विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. १५ सप्टेंबरपर्यंत मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात विविध डेअरी आस्थापनांवर दूध भेसळ व वजनमापनाचे एकूण ७ खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच, अनेक लिटर भेसळयूक्त दुध नष्ट करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली. (7 cases filed against milk adulteration in jalgaon news)

समितीत अपर पोलीस अधिक्षक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व वैध मापनशास्त्र उपनियंत्रक हे सदस्य असून, जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत.

दूध संस्था, संकलन केंद्र, प्रोसेसिंग प्रकल्प, दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे, निर्मिती करणारे, विक्री करणारे, स्विट मार्ट व अन्य सबंधित उद्योजकांच्या तपासण्या धडक मोहिमेत करण्यात येणार आहेत.

दूध उत्पादक व दूध, दूग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी शुद्ध दर्जाचे दूध व दूग्धजन्य पदार्थ ग्राहकांना द्यावे, हा या मोहिमेमागील उद्देश आहे. तपासणीत दोषी आढळून आल्यास संबंधितांवर लगेचच अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

7 cases filed against milk adulteration in jalgaon news
Milk Adulteration : दूध भेसळ रोखण्यासाठी प्रोटीन्स तपासणी आवश्यक!

अशी कारवाई..

या समितीमार्फत १ सप्टेंबरला चाळीसगांव येथे ८ डेअरीच्या तपासणीअंती भेसळयुक्त दुध नष्ट करण्यात आले. तर, ४ डेअरी आस्थापनांवर वजनमापे विभागाने खटले दाखल केले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून एक सॅम्पल तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आलेले आहे.

गोठ्यात अनधिकृत ऑक्सीटोसीनचा वापर आढळल्याने पशुसंवर्धन खात्यामार्फत नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच, ५ सप्टेंबरला एरंडोल येथे ३ वजनमाप खटले दाखल करण्यात आले असून, २२ लिटर भेसळयुक्त दुध नष्ट करून, २ सॅम्पल्स अन्न व औषध प्रशासनाकडून लॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.

7 cases filed against milk adulteration in jalgaon news
Jalgaon News : श्रावण संपण्यापुर्वीच ‘बोकडां’वर संक्रांत; नांद्रा बुद्रुक येथून 9 बकऱ्या व 11 बोकड लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com