Jalgaon Market Committee Election : 87.53 टक्के मतदान; रविवारी मतमोजणी

The queue for voting on Friday and Officials checking the identity card of a voter who came to vote.
The queue for voting on Friday and Officials checking the identity card of a voter who came to vote. esakal

Jalgaon News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी ३,५०५ पैकी ३,०६८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. (87 53 percent voting for Jalgaon market Committee election jalgaon news)

एकूण ८७.५३ टक्के मतदान झाले. नूतन मराठा महाविद्यालयाच्या केंद्रावर झालेला वाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले. जळगाव बाजार समितीच्या संचालकपदासाठी जळगावसह उमाळे, वावडदा, कानळदा, सावखेडा येथे मतदान केंद्रे होते.

नूतन मराठा महाविद्यालयात तीन मतदार केंद्रे होते. सकाळी आठला मतदान शांततेत सुरू झाले. बोगस मतदानावरून अपक्ष उमेदवाराने हरकत घेतल्याने मतदान केंद्रावर किरकोळ गोंधळ झाला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

The queue for voting on Friday and Officials checking the identity card of a voter who came to vote.
Jalgaon Municipal Corporation : अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची महापालिकेची कारवाई

त्यानंतर मतदान शांततेत झाले, तसेच इतर सर्व मतदान केंद्रांवरही मतदान शांततेत झाले. सकाळी मतदान वेगाने झाले, तर दुपारी संथपणा होता. मात्र, दुपारी तीननंतर सर्वच मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. सोसायटी गटात ८०१ पैकी ७९५ मतदारांनी आपला हक्क बजावला. ९९.२५ टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायत गटात ९७.४० टक्के मतदान झाले. ६९२ पैकी ६७४ मतदारांनी मतदान केले. व्यापारी गटात ८६.५७ टक्के मतदान झाले. ११२४ पैकी ९३ मतदारांनी हक्क बजावला. हमाल मापारी गटात ८८८ पैकी ६२६ मतदारांनी मतदान केले. ७०.५० टक्के मतदान झाले. मतदानांची मतमोजणी रविवारी (ता. ३०) होणार आहे. सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.

The queue for voting on Friday and Officials checking the identity card of a voter who came to vote.
Jalgaon News : जैन इरिगेशनचा नागपूरच्या कंपनीशी करार; तंत्रज्ञान विकसित करणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com