Jalgaon News : जैन इरिगेशनचा नागपूरच्या कंपनीशी करार; तंत्रज्ञान विकसित करणार

Jain Irrigation Systems Limited Company MoU with ICAR Central Citrus Research Institute Nagpur jalgaon news
Jain Irrigation Systems Limited Company MoU with ICAR Central Citrus Research Institute Nagpur jalgaon newsesakal

Jalgaon News : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीने आयसीएआरच्या सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (नागपूर)बरोबर सामंजस्य करार केला. (Jain Irrigation Systems Limited Company MoU with ICAR Central Citrus Research Institute Nagpur jalgaon news)

या करारानुसार कंपनीच्या सहकाऱ्यांना रोगमुक्त स्वीट ऑरेंज आणि इतर लिंबूवर्गीय फळे-मँडॅरीन, लिंबू आणि ग्रेफफ्रूट यांच्या रोपांच्या निर्मितीसाठी आवश्यक असे शूट टीप ग्राफ्टिंग (एसटीजी) तंत्रज्ञान शिकविणे, त्यासंबंधी सल्ला-सेवा देवाण-घेवाण होणार आहे.

या तंत्रज्ञानामुळे सीट्रस ग्रीनिंग, ट्रीस्टझा, मोझेक आणि रिंग स्पॉट व्हायरस यांसारख्या विषाणूंच्या आणि सूक्ष्म विषाणूंच्या रोगांपासून मातृवृक्ष (मदर ट्री) मुक्त असतात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jain Irrigation Systems Limited Company MoU with ICAR Central Citrus Research Institute Nagpur jalgaon news
Jalgaon Unseasonal Rain : पन्नासपेक्षा अधिक घरांचे बेळीत उडाले छत

हे तंत्रज्ञान म्हणजे एक प्रकारचे उतिसंवर्धन तंत्र आहे. या तंत्रामध्ये रुटस्टॉक हे मातीमुक्त माध्यमात वाढवले जातात. त्याच्यावर अपिकल मेरिस्टेम ग्रंथींचे डोळे कलम केले जातात. यासाठी अपिकल ग्रंथींचा एक छोटासा भाग (०.१ ते ०.२ एमएम) जो विषाणूमुक्त असतो. त्यांचे रुटस्टॉकवर कलम केले जाते.

यापासून तयार केलेले मातृवृक्ष हे बडस्टीक लावून पुनरुत्पादन केले जातात. असे मातृवृक्ष कोणताही रोग झालेला नाही, अशी तपासणी केली जाते. शास्त्रज्ञ डॉ. एन. विजया कुमारी यांनी हे तंत्रज्ञान सीसीआरआयमध्ये विकसित केले असून, या सामंजस्य करारावर त्यांनी स्वाक्षरी केली. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीतर्फे डॉ. अनिल ढाके यांनी स्वाक्षरी केली. डॉ. बी. के. यादव, सीसीआरआयचे माजी संचालक डॉ. एम. एस. लदानिया व अन्य तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते.

Jain Irrigation Systems Limited Company MoU with ICAR Central Citrus Research Institute Nagpur jalgaon news
Jalgaon KBCNMU News : प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेशाला 10 मेपर्यंत मुदत; येथे करा अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com