मध्य रेल्वेचा 9 दिवस ट्रॅफिक ब्लॉक; 'या' गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरीजवळील टिटोली यार्डात 9 दिवस इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे.
Rail
Railsakal

भुसावळ (जि. जळगाव) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरीजवळील टिटोली यार्डात २३ ते ३१ मे असे नऊ दिवस इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे. यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेस व मनमाड-मुंबई या दोन गाड्या रद्द, तर काही गाड्या इगतपुरी रेल्वेस्थानकावर चार तासांपेक्षाही जास्त वेळ उभ्या केल्या जाणार आहेत. (9 days traffic block of Central Railway, train schedule change)

मनमाड-मुंबई-मनमाड (०२१०२ व ०२१०१) ही गाडी २८ मे ते २ जूनपर्यंत रद्द असेल. तर २८ मे या दिवशी डाऊन गाड्यांचे रेग्युलेशन केले आहे. यामुळे एलटीटी-छपरा (११०५९), एसटीटी-जयनगर (११०६१) आणि अप मार्गावरील जालना-मुंबई (१२०७२) जनशताब्दी, पाटलीपुत्र-एलटीटी (१२१४२ ), गोरखपूर-पनवेल गाड्या विलंबाने धावतील.

Rail
चोपडा-शिरपूर रस्त्यावर रस्तालूट; 60 हजारांचा ऐवज लंपास

विलंबाने व रद्द झालेल्या गाड्या

टिटोली यार्डात मंगळवारी (ता. ३१) सकाळी सव्वापाच ते सव्वाअकरापर्यंत ब्लॉक आहे. या पार्श्वभूमीवर २८ मेस एलटीटी-पाटलीपुत्र (१२१४१) रविवारी (ता. २९) सकाळी साडेचारला, पनवेल-गोरखपूर शनिवारी (ता.२८) सायंकाळी साडेसहाला, तर मुंबई-जालना (१२०७१) जनशताब्दी एक्स्प्रेस व जालना-मुंबई (१२०७२) जनशताब्दी रद्द असेल. डाऊन कामाख्या-एलटीटी मंगळवारी (ता.३१) विलंबाने धावेल.

इगतपुरीला थांबणाऱ्या गाड्या

ब्लॉकच्या काळात मंगळवारी (ता. ३१) इगतपुरी स्थानकावर दीड तास ते साडेचार तास गाड्यांना थांबा मिळेल. परिणामी या गाड्या नियोजित स्थानकांवर उशिराने पोहोचतील. त्यात सोमवारी (ता.३०) पाटलीपुत्र-एलटीटी, गोरखपूर-पनवेल, छपरा-एलटीटी, गोरखपूर-एलटीटी, तर रविवारी (ता. २९) गुवाहाटी-एलटीटी एक्स्प्रेला थांबा मिळेल.

Rail
दिव्यांगाच्या कलाकृतीची ‘इंडिया बुक रेकॉर्ड'कडून दखल

डाऊन गाड्यांचे मंगळवारी रिशेड्युलिंग

एलटीटीहून सकाळी १०.५५ वाजता सुटणारी छपरा दुपारी (११०५९) सव्वाबाराला, सीएसटी येथून सकाळी ११.०५ ला सुटणारी मुंबई-पाटणा (८२३५६) एक्स्प्रेस दुपारी एकला सुटेल. एलटीटी येथून साडेअकराला सुटणारी जयनगर एक्स्प्रेस साडेबाराला, पनवेल येथून दुपारी ३.५० ला सुटणारी गोरखपूर एक्स्प्रेस रात्री साडेआठला, एलटीटी येथून रात्री ११.३५ वाजता सुटणारा पाटलीपुत्र १ जूनला पहाटे साडेचारला सुटेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com