जळगाव : तरुणाच्या डोक्यात मारली वीट

सुप्रीम कॉलनीत किरकोळ कारणावरून तरुणाला शिवीगाळ करून डोक्यात वीट मारल्याने जखमी झाला.
Crime News
Crime News esakal
Updated on

जळगाव : सुप्रीम कॉलनीत किरकोळ कारणावरून तरुणाला शिवीगाळ करून डोक्यात वीट मारल्याने जखमी झाला. आकाश निमसे (वय २४) खासगी वाहनावर चालक म्हणून काम करून उदरनिर्वाह करतो.

सोमवारी (ता. १३) रात्री अकराला आकाश त्याचा मित्र प्रवीण याला सोडण्यासाठी सुप्रीम कॉलनीतील प्रेमाबाई शाळेजवळ आला. तिथे बसलेला प्रेमचंद भोई म्हणाला, की ‘तू इथे का आला?’ त्यावर मी मित्राला सोडण्यासाठी आलो असल्याचे आकाशने सांगितले. उलट उत्तर देतो, याचा राग आल्याने प्रेमचंद भोई, बाळू जैन (दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी) यांनी आकाशला शिवीगाळ करून मारहाण केली, तर एकाने आकाशच्या डोक्यावर वीट मारून गंभीर दुखापत केली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याबाबत आकाशच्या फिर्यादीवरून संशयित प्रेमचंद भोई आणि बाळू जैन यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सचिन पाटील तपास करीत आहेत.

Crime News
लाच स्वीकारताना कारकुनाला दुसऱ्यांदा पकडले
Crime News
पाऊस लांबला तरी, आताच पेरण्या करू नका - कृषीमंत्री दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com