Jalgaon News : सुमारे 1700 ग्रंथपाल पूर्ण वेळ होणार! राज्य शासनाचा निर्णय

librarian
librarianesakal

Jalgaon News : राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश आले आहे. (About 1700 librarians will be full time Decision of State Govt Jalgaon News)

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनने अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी केली होती. त्यासाठी शासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून, निवेदन देऊन प्रयत्न केले होते. तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे याबाबत महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

२ फेब्रुवारी २०२२ ला ग्रंथपाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शुभांगी पाटील यांनी तत्कालीन शिक्षण संचालक दिनकर टेमकर व महेश पालकर यांच्याशी पुणे येथे बैठक घेऊन अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याबाबत सविस्तर चर्चा करून मार्ग काढला होता.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

librarian
Akshay Tritiya 2023 : कर्नाटक, तेलंगणा, आंध्रचा आंबा बाजारात; परराज्यातील कैरी देखील व्रिकीला!

त्यानुसार ज्या शाळांवर १ हजार पटसंख्या असेल, त्या शाळांवर पूर्णवेळ ग्रंथपालांची समायोजन करावे, तसेच पटसंख्या कमी असलेल्या दोन किंवा तीन शाळा मिळून एक ग्रंथपाल समायोजित करून त्याला पूर्ण वेळ करावे, अशी मागणी केली होती. तसा प्रस्ताव शासनाकडे शिक्षण संचालकांनी सादर केला होता.

त्याच पद्धतीने शिक्षण विभागाने ग्रंथपालांचे पूर्णवेळ समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक हजार ७०० ग्रंथपाल अर्ध वेळवरून पूर्ण वेळ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी दिली.

librarian
Nashik: अजित पवारांच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या गळाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com