esakal | गुन्ह्यात आरोप न करण्यासाठी लाच; हवालदारासह पोलिसपाटील ‘ट्रॅप’

बोलून बातमी शोधा

गुन्ह्यात आरोप न करण्यासाठी लाच; हवालदारासह पोलिसपाटील ‘ट्रॅप’ }

पोलिसपाटील यांनी ४० हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती आरोपींनी तक्रारदाराकडे १५ हजारांची मागणी केली.

गुन्ह्यात आरोप न करण्यासाठी लाच; हवालदारासह पोलिसपाटील ‘ट्रॅप’
sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : गुन्ह्यात आरोपी न करणे, तसेच जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदार व पोलिसपाटलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचत कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आवर्जून वाचा- धुळीचे प्रदूषण उठले नागरिकांच्या जिवावर; श्‍वसनाचे विकार वाढले 
 

याबाबत पथकाने दिलेल्या माहितीनुसार, मंगरूळ (ता. पारोळा) येथील २२ वर्षीय तक्रारदाराने १३ फेब्रुवारीला पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदारासह आई-वडिलांना गुन्ह्यामध्ये आरोपी न करणे, तसेच तक्रारदाराच्या भावास जामीन मिळवून देण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपी पोलिस हवालदार रवींद्र रावते व मंगरूळ येथील पोलिसपाटील प्रल्हाद पाटील यांनी ४० हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती आरोपींनी तक्रारदाराकडे १५ हजारांची मागणी केली.

सापळा रचला

तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे याची माहिती दिली असता अधिकारी पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार जोहरे, पो. ना. संदीप परग, संतोष हिरे, कृष्णकांत वाडिले, सुधीर सोनवणे, राजन कदम, भूषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, सुधीर मोरे यांच्या सहकार्याने सापळा रचला. आरोपींविरुद्ध कारवाई करून पोलिसपाटील प्रल्हाद पाटील यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

संपादन- भूषण श्रीखंडे