महामार्गावर अपघात सत्र सुरूच; अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस दलाचे विधी अधिकारीचा मृत्यू  

रईस शेख
Wednesday, 20 January 2021

बांभोरी जवळ त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात पोलिस दलाचे विधी अधिकारी व पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

जळगाव :  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अपघातांची मालिका सुरूच असून आज अज्ञात वाहनाने पारोळाकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देत पेाबारा केला. या अपघातात दुचाकीस्वार पोलीस दलाचे विधी अधीकारी ॲड. दुर्गादासगिरी गोसावी जागीच ठार झाले असून त्याच्या सोबतचा पेालीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना सकाळी घडली. दोघेही दुचाकीने पारेाळा येथे निघाले होते. 

आवर्जून वाचा- लग्नमंडपात सुरू होते कन्यादान; अचानक नवरदेवाच्या आईचे उडाले होश आणि सर्वांची सुरू झाली शोधाशोध !
 

जिल्हा पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून कार्यरत ॲड. दुर्गादासगिरी मधुकर गोसावी आणि शनिपेठ पोलीस ठाण्याचे पेालिस कर्मचारी संदीप भीकन पाटील असे दोघेही आज दुचाकी (एमएच १९ बीएफ १८८६ )ने जळगावहून पारोळ्याकडे द्वारदर्शनसाठी निघाले होते. 

आवश्य वाचा-  एका मताची जादू चालली; भाजपकडे येणारी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे गेली
 

बांभोरी जवळ त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुर्गादासगिरी मधुकर गोसावी (वय-३७, रा. पाचोरा) हे जागीच ठार झाले असून संदीप भीकन पाटील (वय -३५, रा. पोलीस वसाहत, जळगाव) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident marathi news jalgaon two wheeler accident death law officer injured one