सुसाट वेगाने धावणारा ट्रक; अचानक नियंत्रण सुटले आणि वीसफुट खोल नाल्यात कोसळला 

ACCIDENT
ACCIDENT

जळगाव : पहाटची वेळ रस्ता सुमसाम आणि या रस्त्यावरून सुसाट धावणारा ट्रकवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि थेट हा ट्रक वीस फुट नाल्यात कोसळ्याची घटना घडली. ही घटना जळगाव तालूक्यातील म्हसावद-वावडदा रोडवर घडली.

वावडदा(ता.जळगाव) येथील शेतकरी तरुणाला अपघात झाल्याचे दिसताच त्याने पोलिस पाटिल विनोद गोपाळ यांच्या घरी जावून माहिती दिली. गोपाळ यांनी ग्रामस्थांसह अपघात स्थळावर धाव घेतली. म्हसावद-वावडदा रेाडवरील कुरकुरे नाल्या वरुन ट्रक कोसळल्याचे दिसून आले. आंध्र प्रदेशातून नारळ घेवून जात असलेला ट्रक वावडद्याकडून म्हसावदच्या दिशेने सुसाट वेगात जात असतांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने नाल्याचा कठडा तोडून ट्रक चक्क विसफुट खोल नाल्यात कोसळला. अपघातात ट्रकच्या केबीन मधील चालक व क्लिनर अडकलेले असल्याने पेालिस पाटलाने एमआयडीसी पोलिसांना घटना कळवली. अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांसह उपनिरीक्षक विशाल सोनवणे घटनास्थळावर दाखल झाले. 

अडकलेल्या जखमींना ग्रामस्थांनी काढले

पोलिस पाटिल विनोद तुळशीराम गोपाळ यांना माहिती मिळताच त्यांनी मदतीला धाव घेत ग्रासम्थाच्या मदतीने ट्रक मध्ये अडकलेल्या चालकासह क्लिनरला बाहेर काढले. पोलिसांच्या मदतीने जखमी व मयताला ॲम्बुलन्सद्वारे जळगावी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. 

कर्ककश..हॉर्नने दिली माहिती 
नाल्या जवळील शेतात पाणी द्यायला आलेल्या शेतकऱ्याला ट्रकच्या हॉर्नचा कर्ककश आवाज सारखा वाजत असल्याने त्याने जाऊन बघीतल्यावर नाल्यात ट्रक पडल्याचे दिसून आला. पोलिस पाटिल विनोद गोपाळ यांना कळवल्यानंतर गावातील राजेश प्रकाश पाटिल, नितीन रामचंद्र गोपाळ, आबा महाजन अशांनी देान तासांच्या अथक प्रयत्ना अंती केबीन कापून अडकलेल्या चालक व क्लिनरला बाहेर काढले. केबिन मधील कागदपत्रे व फाईलवरून चालक शेख बडमियाँ शेख उदांत साहेबू (वय-३०,रा.१३३ विभारीता ताडून जि.कृष्णा, आंध्रप्रदेश) असे चालकाचे नाव असून त्याच्या सोबतचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तातडीने ॲम्बुलन्स बोलावून मृतदेहासह जखमीला जिल्‍हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे रवाना करण्यात आले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com