Jalgaon News : रेल्वे मालधक्क्यावरील वाहनामुळे शिवाजीनगर पुलावर अपघात

 Accident news
Accident newsesakal

जळगाव : शिवाजीनगर पुलावरून जात असलेल्या सायकलस्वारास मालवाहू ट्रकने धडक दिल्याने तो जखमी झाला आहे. धडक देणारा ट्रक निघून गेला.

गेल्या आठवडाभरात भरधाव वाहनामुळे दोन किरकोळ अपघात झाले आहेत. त्यामुळे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख विजय बांदल यांनी केली आहे.

शिवाजीनगर पुलाचे नूतनीकरण होऊन वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला आहे. शहरातून मालवाहू मोठ्या गाड्यांना बंदी असतानाही रेल्वे मालधक्क्यावरील मालवाहू गाड्या शिवाजीनगर पुलावरून टॉवरमार्गे बिनधास्त जात आहेत. विशेष म्हणजे या गाड्या अत्यंत भरधाव जात असतात. (Accident on Shivaji Nagar Bridge due to a vehicle on a railway freight Jalgaon Accident News)

 Accident news
Jalgaon News : RLच्या फर्मची CBIकडून तपासणी

मंगळवारी (ता. १३) शिवाजीनगरातून अमरसिंग ठाकूर सायकलवरून जात असताना, मालधक्क्यावरील ट्रकने त्याच्या सायकलला मागून धडक दिली. यामुळे तो खाली पडला. सुदैवाने त्यास किरकोळ मार लागला आहे.

मात्र, ट्रकचालक ट्रक न थाबविता निघून गेला. शिवसैनिक व काही नागरिकांनी त्या जखमी इसमास उचलून रिक्षात टाकून दवाखान्यात नेले. याबाबत शिवसेना शिवाजीनगर विभागप्रमुख विजय बांदल यांनी सांगितले, की रेल्वे मालधक्क्यावरील भरधाव वाहनामुळे गेल्या आठवड्यात दोन ते तीन किरकोळ अपघात पुलावर झाले आहेत.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

 Accident news
Jalgaon News : अवाजवी मालमत्ता कराच्या हरकतींवर 20, 21 ला सुनावणी

सायकलवर जाणाऱ्या शाळकरी मुलांना किरकोळ मार लागला होता. आजही एका इसमाला भरधाव वाहनांनी धडक दिली व तो वाहनचालक वाहन घेऊन निघून गेला. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या भरधाव वाहनांना आळा घालण्यासाठी पुलाखालील भागात गतिरोधक टाकण्याची गरज आहे. याबाबत दखल घेऊन गतिरोधक बसवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 Accident news
Jalagon News : चोपडा पालिकेचे अधिकारी रडारवर!; सफाई कंत्राटातील अनियमितता सिद्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com