Jalgaon Crime: भडगावला अवैध वाळूचे 2 ट्रॅक्टर, डंपरवर कारवाई

A revenue team member with a dumper full of seized sand
A revenue team member with a dumper full of seized sandesakal

Jalgaon Crime : कराब शिवारात अवैध वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर व एक डंपर सलग दोन दिवस कारवाई करून महसूल पथकाने पकडले. त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

कराब शिवारात गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारी दोन ट्रक्टर व एक डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडली. (Action against 2 illegal sand tractors dumpers in Bhadgaon Jalgaon Crime)

पथकात नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे, तलाठी पाशा हलकारे, रामसिंग जारवाल, राहुल पवार, व्ही. सी. पाटील, व्ही. पी. शिंदे, अविनाश जंजाळे, वाहनचालक लोकेश वाघ यांचा सहभाग होता.

दरम्यान, १ एप्रिलपासून आजपर्यंत अवैध गौण खनिज वाहतूक करणारी १८ वाहने पकडून वाहनांवर २७ लाख 18 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या आठ वाहनांच्या आरसी बुकवर बोजा बसवण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A revenue team member with a dumper full of seized sand
Sangli Crime : गांजाची नशा; ॲडिक्शन ते रुग्णालयात ॲडमिशन

एका वाहनमालकाच्या सातबारावर बोजा बसविण्यात आला आहे. पथकाचा पाठलाग करणाऱ्या १२ लोकांवर चॅप्टर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. लवकरच अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव लावून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांच्या स्थावर, जंगम मालमत्तांचा शोध घेऊन त्यांचा लिलाव लावण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिली.

A revenue team member with a dumper full of seized sand
Crime News: घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाच्या घरातून चोरले 11 लाख रुपये, 5 वर्षात बनली लखपती पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com