Crime News: घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाच्या घरातून चोरले 11 लाख रुपये, 5 वर्षात बनली लखपती पण...

उत्तराखंडमधील हल्दवानीमध्ये पोलिसांनी एका महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे
Crime News
Crime NewsEsakal

उत्तराखंडमधील हल्दवानीमध्ये पोलिसांनी एका महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी महिला डॉक्टर दाम्पत्याच्या घरी काम करायची. या जोडप्याने तिला 2019 मध्ये घरगुती कामासाठी ठेवलं होतं. 2022 पासून त्याच्या घरातून पैसे चोरीला जात होते. रक्कम कमी होती, त्यामुळे जोडप्याने फारसे लक्ष दिले नाही.

त्याच महिन्यात डॉक्टरांनी त्यांच्या कपाटामध्ये 10 लाख रुपये ठेवले होते. दोन दिवसांनी पैसे मोजले तेव्हा त्यात पाच लाख रुपयांची कमतरता होती. त्यानंतर घरातील कॅमेऱ्याच्या मदतीने घरी काम करणाऱ्या महिलेला चोरी करताना पकडले. घटनेनंतर या महिलेला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांना माहिती देताना डॉ.राहुल सिंग यांनी सांगितले की, ते आणि त्याची पत्नी डॉक्टर आहेत. शहरातील एका खासगी रुग्णालयात ते काम करतात. त्यांचे घर नैनिताल रोडवर आहे. 2019 मध्ये त्याने मधू नावाच्या महिलेला त्याच्या घरी घरगुती कामासाठी ठेवले होते. या महिलेला महिन्याला कामासाठी 4500 रुपये पगार दिला जात होता. पुढे त्यांनी सांगितले की, 2022 पासून त्याच्या घरात पैसे गायब होऊ लागले. रक्कम फार मोठी नसल्याने त्यांनी फारसे लक्ष दिले नाही.

Crime News
PM मोदींच्या कार्यक्रमामुळे साहेबांसाठी इकडे आड-तिकडे विहिर; मोदींसोबत एका मंचावर बसू नये अशी नेत्यांची मागणी

चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली

डॉ.राहुल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी त्यांनी कपाटात 10 लाख रुपये ठेवले होते. 25 तारखेला कपाटात ठेवलेल्या रकमेची मोजणी केली असता त्यात 4.7 लाख रुपयांची कमतरता होती. घरी काम करणाऱ्या महिलेवर संशय आल्याने त्यांनी हॅन्डी कॅम रेकॉर्डिंग मोडमध्ये कपाटात ठेवला आणि तेथे असलेल्या नोटांच्या अनुक्रमांकांचे फोटोही काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पैसे मोजले तर ते 7500 रुपयांनी कमी होते. जेव्हा त्यांनी कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग पाहिले तेव्हा घरी काम करणारी मधु पैसे चोरताना कॅमेऱ्यात कैद झाली.

Crime News
Nitin Gadkari: "शरद पवार म्हणजे जपानी बाहुली"; गडकरींची शरद पवारांवर खोचक टीका

पोलिसांनी 4,77,500 रुपये जप्त केले

हल्दवानी येथील पोलिसांनी सांगितलं की, डॉ. राहुल सिंह यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्याघरी काम करणाऱ्या मधुला तिच्या घरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्या घरातून चोरीचे 4,77,500 रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी मधुच्या बँक खात्याची झडती घेतली असता त्यात जमा केलेले ६,३०,००० रुपये सापडले. बँकेत जमा असलेली बरीच रक्कम चोरल्याचे मधुने पोलिसांना सांगितले आहे. मधुचे बँक खातं बंद करण्यात येणार असल्याचेही पोलीसांनी सांगितले आहे.

Crime News
Accident News: मदुराई जिल्ह्यात कार अन् कंटेनरची धडक, भीषण अपघात 4 जणांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com