भुसावळ विभागात ‘फुकट्या’ रेल्वे प्रवाशांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ticket checking at bhusawal division railway station

भुसावळ विभागात ‘फुकट्या’ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

भुसावळ (जि. जळगाव) : फुकट्या रेल्वे प्रवाशांमध्ये (Without Ticket Passengers) रेल्वेच्या महसुलावर (Revenue) मोठा परिणाम होत असल्याने अशा प्रवाशांविरोधात रेल्वेने मोहीम उघडत कारवाईला सुरवात केली आहे. १८० तिकीट तपासणीसांना सोबत घेत १४० आरपीएफ (RPF) कर्मचाऱ्यांनी ४६ रेल्वेगाड्यांची तपासणी करीत फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. विभागातील सर्वच स्थानकावर तिकीट तपासणीस यांनी तिकिटे तपासल्याने खळबळ उडाली तर या कारवाईत सातत्य राखण्याची मागणी होत आहे. (Action taken against without ticket train passengers in Bhusawal division Jalgaon News)

डीआरएम एस. एस. केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे, आरपीएफ आयुक्त क्षितीज गुरव यांनी सकाळी सहापासूनच रेल्वेस्थानकांवर तळ ठोकला. या वेळी सकाळी बडनेरा जाणारी मेमू, महाराष्ट्र एक्स्प्रेस, ईगतपुरी शटल आदी ४६ गाड्यांमध्ये व रेल्वेस्थानकांवर तिकीट तपासणी केली. या वेळी आरपीएफ व वाणिज्य विभागाचे तिकीट निरीक्षक यांचे संयुक्त ३० पथके तैनात होते. अचानक सुरू असलेल्या तिकीट तपासणीमुळे विविध रेल्वेस्थानकांवर उतरणाऱ्या फुकट्या प्रवाशांमध्ये भीती पसरली.

या स्थानकांवर तपासणी

रेल्वेच्या संयुक्त पथकाकडून विभागातील नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवर अचानक तिकीट तपासणी करण्यात आली. तसेच खंडवा ते इगतपुरी या विभागात पथके तैनात होती. यात अमरावती, चाळीसगाव, धुळे, जलंब, खामगाव या स्थानकांवर सुद्धा तपासणी करण्यात आली.

हेही वाचा: राजकीय खेळी पूर्ण, न्यायालयीन निकालाची प्रतीक्षा : चिमणराव पाटील

जनरल तिकीट बुधवारपासून

जनरल तिकीट खिडक्या बुधवारपासून (ता.२९) सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी राहणार असून, याच गर्दीचा फायदा घेत अनेक जण विना तिकिटानेच प्रवास करीत असल्याने मोहीम नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. संयुक्त तपासणी मोहिमेमुळे फुकट्या प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे.

हेही वाचा: आषाढी एकादशीनिमित्त विशेष गाड्या धावणार; 6 जुलैपासून होणार रवाना

Web Title: Action Taken Against Without Ticket Train Passengers In Bhusawal Division Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..