Jalgaon Crime News : गुन्हेगारांचे धाबे दणाणले; जळगावच्या गॅंगवर मोक्कांतर्गत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrest

Jalgaon Crime News : गुन्हेगारांचे धाबे दणाणले; जळगावच्या गॅंगवर मोक्कांतर्गत कारवाई

जळगाव : पोलिस दलाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी कारवाईला सुरूवात केली आहे. शहरातील एक गॅंगला मोक्का लावला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५ जणांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. (Action taken under mcoca act against gang of Criminals Jalgaon crime news)

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील एका गॅंगवर मोक्का कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News: पाच संकुल बाजारपट्ट्यात रात्री सफाईचा प्रस्ताव; मक्तेदाराकडून काम

नाशिक परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यावरून एमआयडीसी पोलिसांत दाखल खुनाच्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख मोनूसिंग जगदीशसिंग बावरी, मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, सोनूसिंह जगदीशसिंग बावरी, सतकोर जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी (सर्व रा. सिकलकर वाडा, शिरसोली नाका) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सर्व गुन्हेगार सध्या कारागृहात असून. त्यांना मोक्का कायद्यानुसार नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Jalgaon News : आदिवासी कोळी जमातीचे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू