
Jalgaon News : कोयत्याने आईचा गळा चिरताना चिमुरडीला दिसला बाप
जळगाव : करगाव तांडा (ता. चाळीसगाव) येथे माहेरी गेलेल्या पत्नीचा मटण कापण्याच्या कोयत्याने गळा चिरून हत्या केली होती. (After 2 days of hearing in the district court verdict given little girl saw her father cutting her mothers throat with coyote jalgaon news)
तीन वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन पुरावे, दस्तऐवजासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुलीने जसाचा तसा घटनाक्रम न्यायालयात सांगितल्याने संशयित पिता युवराज कपुरचंद जाधव (वय ५०) याच्याविरुद्ध दोषारोप सिद्ध झाले आहेत.
कौटुंबीक वाद झाल्याने पिंपरखेड तांडा (ता. चाळीसगाव) येथील युवराज कपूरचंद जाधव (वय ५०) यांची पत्नी कविता मुलगा व मुलगीला घेऊन करगाव तांडा येथे माहेरी निघून आली होती.
भाऊ व वहिनी आणि दोघा मुलांसह १६ जून २०२० ला घराच्या गच्चीवर झोपले असताना, संशयित पती युवराज याने हाताने बांबूची शिडी तयार करून गच्चीवर चढला व मध्यरात्री दोनच्या सुमारास मटण कापण्याच्या कोयत्याने पत्नीचा गळा चिरून हत्या केली हेाती.
याबाबत मृताचा भाऊ सुनील राठेाड याच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पती युवराजविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश बी. एच. वावरे यांच्या न्यायालयात झाली.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल, तपासाधिकाऱ्यांचे जाबजबाब याच्या आधारावर ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी साक्ष नोंदवून घेतल्या. त्यावरून संशयिताविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला आहे.
आईचा हात अंगावर पडला अन्...
मृत कविताबाई घटनेच्या रात्री तिची मुलगी मयुरी, मुलगा धीरज, भाऊ सुनील व वहिनीसह गच्चीवर झोपली होती. संशयिताने शेजारच्या घरावरून शिडी लावून गच्चीवर आला. पत्नी कविताच्या छातीवर बसून त्याने तिच्या गड्यावर वर्मी घाव घालून गळा चिरला. त्यावेळी तिचा हात शेजारी झोपलेल्या मुलीच्या अंगावर पडला अन् मुलगी मयुरीला जाग आली.
तेव्हा तिने पाहिले, की वडील युवराज आईच्या छातीवर बसून तिच्या गळ्यावर वार करत होता. हा सर्व घटनाक्रम जसाचा तसा मयुरी व तिचा भाऊ धीरज यांनी न्यायालयात मांडला. न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून, युवराज जाधव याच्याविरुद्ध दोषारोप सिद्ध झाले आहेत. गुरुवारी (ता. २३) न्यायाधीश एस. बी. वावरे यांच्या न्यायालयात शिक्षेवर कामकाज होण्याची शक्यता आहे.