
Jalgaon News : बुरखाधारी संशयितांच्या कोठडीत पुन्हा वाढ
जळगााव : जिल्हा न्यायालयात (Court) तारखेवर हजर करण्यासाठी आणलेल्या संशयितांवर गोळीबाराच्या प्रयत्नात असलेल्या बुरखाधारी संशयितांना न्यायालयाने पुन्हा पोलिस कोठडीत रवाना केले आहे. (again increase in custody of veiled suspects jalgaon crime news)
प्रमुख संशयित मनोहर सुरळकर याच्या मुलाला न वाचविता आम्ही आमचा जीव वाचवून पळून गेल्याच्या खुन्नसमधून आता आमचे नाव अडकविले जात असल्याचे दोघा संशयितांच्या चौकशीतून समोर आले आहे. परिणामी, अटकेतील मनोहर व त्याचा मित्र सुरेश या दोघांना वाढीव कोठडीत पाठविले आहे.
आमचा काहीच संबध नाही...
मला प्रवीण गौतम मेघे व विक्की अशोक वाघ यांनी पिस्तूल आणून दिले व ते सतत संपर्कात होते, असे मुख्य संशयित मनोहर सुरळकर याने सांगितले.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
त्या अधारे दोघांची शहर पेालिसांनी चौकशी केली असता, ते दोघे बुरखा घालून न्यायालयात आले होते. धम्मप्रिय सुरळकरवर हल्ला झाला. त्यात त्याची हत्या झाली. त्यावेळी आम्ही पळून गेलो होतो, म्हणून आता मनोहर सुरळकर त्यांचे नाव गुंतवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.