Jalgaon : शेतकऱ्यांसाठी ‘शेती अवजारे बँक’

Distinguished guests present at the launch of Agricultural Tools Bank at a function organized by Bharari Foundation.
Distinguished guests present at the launch of Agricultural Tools Bank at a function organized by Bharari Foundation.esakal

जळगाव : भरारी फाउंडेशन जिल्हा प्रशासन कृषी विभाग जळगाव व उभारी प्रकल्पाअंतर्गत शेतकरी संवेदना अभियानाच्या माध्यमातून 'शेती अवजारे बँकेचा' (Agricultural Tools Bank) शुभारंभ शुक्रवारी (ता. १) जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत झाला. (Agricultural Tools Bank for farmers Jalgaon News)

या बँकेच्या माध्यमातून अल्पभूधारक गरजू शेतकऱ्यांना शेतीची अवजारे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात जिल्हाभरातील १०० गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले. ‘शेती अवजारे बँक’ उपक्रमात नवीन ट्रॅक्टर, टिलर, नांगर, रोटावेटर अशा दहा लाख रुपयांच्या अवजारे, बँकेच्या सामग्रीचे अनावरण मान्यवरांच्या हातून करण्यात आले.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जळगाव पीपल्स बॅंकेचे माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील, रजनीकांत कोठारी, सनशाइन ॲग्रोचे संचालक राजेश चौधरी, श्रीराम पाटील, रवींद्र लढ्ढा, कुशल गांधी, बाळासाहेब सूर्यवंशी, किशोर ढाके, उद्योजक अनिश शहा, पारस राका, स्वरूप लुंकड, सपन झुनझुनवाला, लखीचंदजी जैन, चंदन अत्तरदे, अशोक चौधरी, पवन जैन, अजिंक्य देसाई हे सर्व मान्यवर उपस्थित होते. पद्मालय फार्मर प्रोड्युसर कंपनी, एकचक्र शेतकरी उत्पादक कंपनी, हायटेक बियाणे उत्पादक कंपनी, राहुल पाटील, दीपक परदेशी, मोहित पाटील, सचिन महाजन, रितेश लिमडा, दीपक विधाते कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

Distinguished guests present at the launch of Agricultural Tools Bank at a function organized by Bharari Foundation.
सीपेट प्रकल्पाला भुजबळांकडून खोडा; खासदार हेमंत गोडसे यांचा आरोप

गरजू शेतकऱ्यांना साहाय्य

आत्महत्याग्रस्त कुटुंब, अल्पभूधारक व कोरडवाहू शेती करणारे शेतकरी किवा ज्यांच्याकडे नांगर, टिलर, रोटावेटर आदींसाठी पैसे नाहीत अशा शेतकऱ्यांना ही अवजारे बँक मोफत उपलब्ध करून दिली जाईल. शेतकरी हा देशाचा कणा आहे, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. भालचंद्र पाटील यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांबद्दल संवेदना जागवल्या. रजनीकांत कोठारी यांनी पुढील वर्षी नवीन ट्रॅक्टर घेऊन देण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी शंभर शेतकऱ्यांना मका ज्वारी तूर बाजरी व सोयाबीनचे बियाणे देण्यात आले.

Distinguished guests present at the launch of Agricultural Tools Bank at a function organized by Bharari Foundation.
बंडखोरांना जिवंतपणी दाखवले अमरधाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com