Agriculture Innovation : पिकांवरील फवारणीसाठी कृषी महाड्रोन ठरतोय वरदान

Agriculture Innovation
Agriculture Innovationesakal

पाचोरा : उच्च व तांत्रिक शिक्षित युवकांनी केवळ नोकरीसाठी शिक्षण न करता संशोधक वृत्ती विकसित करावी, असा विचार व्यक्त होत असला तरी बहुतांश उच्चशिक्षित तरुण संशोधनाकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाहीत. परंतु पाचोरा येथील अभियंता असलेल्या राजपूत बंधू- भगिनीने शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी आपल्या कल्पकतेतून कृषी महाड्रोन विकसित केला आहे.

येथील वीज मंडळाचे निवृत्त अधिकारी प्रताप राजपूत यांचे पुत्र आशिष व कन्या रजनी यांनी उच्च शिक्षण घेतले. आशिष इलेक्ट्रिकल अभियंता तर रजनी संगणक अभियंता आहे.

त्यांनी नोकरी करत असताना संशोधक वृत्ती विकसित केली व त्यांनी शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी तसेच मजुरांचा तुटवडा व वाढती मजुरी यावर पर्याय म्हणून कृषी महाड्रोन विकसित करून त्याचे नुकतेच प्रात्यक्षिक करून दाखवले. (Agriculture Innovation Agricultural drones boon for crop spraying Jalgaon News)

Agriculture Innovation
Jalgaon Crime Update : हॉटेल्स चोरट्यांचे लक्ष्य

हा महाड्रोन शेतकऱ्यांना वरदान ठरण्याचा दावा राजपूत बंधू-भगिनींने केला आहे. शेतातील पिकांवर फवारणी करताना शेतकरी अथवा शेतमजूर योग्य ती काळजी घेत नाहीत. अथवा फवारणी करताना हवेची बदलणारी दिशा यामुळे फवारणीप्रसंगी अंगावर, हातापायांवर व तोंडावर विषारी द्रव उडतात. त्यामुळे काहींना अपंगत्व येते तर आतापर्यंत विषबाधेतून अनेक शेतकरी व शेतमजुरांचे बळी गेले आहेत.

आशिष राजपूत व रजनी राजपूत हे दोघे शेतकरी कुटुंबातील असल्याने कमी वेळेत व कमी खर्चात सुरक्षित पद्धतीने पिकांवर फवारणी करता यावी, यासाठी त्यांनी महाड्रोन विकसित करण्याचा संकल्प केला व त्यात ते यशस्वी झाले आहेत.

Agriculture Innovation
Jalgaon Crime Update : हॉटेल्स चोरट्यांचे लक्ष्य

त्यांनी केलेल्या महाड्रोनसाठी तीन लाख ५० हजार रुपये खर्च आला असून, या ड्रोनमध्ये ११ लिटर पाणी क्षमतेची टाकी असून, ८ ते १० मिनिटात एक हेक्टर क्षेत्रात या ड्रोनमुळे फवारणी करता येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भविष्यात संशोधनाअंती कमी खर्चात हा ड्रोन तयार करण्याचा निर्धारही त्यांनी केला. या ड्रोनमुळे शेतकऱ्यांच्या जीविताची सुरक्षा होणार असून, शेतमजुरांचा तुटवडा व वाढती मजुरी हे प्रश्न सुटण्यास देखील मदत होणार असल्याचा दावा या बंधू-भगिनीने केला आहे.

या कृषी महाड्रोनची चाचणी त्यांनी नुकतीच पाचोरा येथे केली. यावेळी कृषीतज्ज्ञ, कृषी अभ्यासक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कृषी महाड्रोन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे जीवन सुरक्षित करून त्यांना वरदान ठरणार असल्याचा दावा आशिष व रजनी राजपूत यांनी केला आहे. राजपूत बंधू भगिनींच्या या कृषी संशोधनाचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

Agriculture Innovation
Jalgaon : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेस मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com