Latest Marathi News | भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेस मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Beating

Jalgaon : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेस मारहाण

जळगाव : शाहूनगर परिसरात असलेल्या इंदिरानगरात भांडण सोडविण्याच्या कारणावरून महिलेस मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.

चांदणी डायमंड बिहारी (वय ३५, रा. फिरोज पान सेंटर, जळगाव) या महिलेचे त्याच भागातील यास्मिनबी यांच्याशी गुरुवारी (ता. १३) रात्री आठला भांडण सुरू होते.(woman come to settle quarrel beaten Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon Municipal Corporation : कर्मचारी भरतीचा आकृतिबंध लवकरच मंजूर

याच परिसरातील रहिवासी साजिदा सत्तार भिस्ती (४०) या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेल्या. याचा राग आल्याने चांदणी डायमंड बिहारी हिने शिवीगाळ करून हातातील फरशी साजिदा भिस्ती यांच्या डोक्यावर मारून त्यांना जखमी केले.

या प्रकरणी साजदा भिस्ती यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चांदणी डायमंड बिहारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक धनराज निकुंभ तपास करीत आहेत.

हेही वाचा: Crime News : वाढदिवसाला जाणाऱ्या तरुणावर चॉपरने हल्ला

टॅग्स :Jalgaoncrimewomen