Jalgaon Crime Update : हॉटेल्स चोरट्यांचे लक्ष्य

Hotels are target of Thieves
Hotels are target of Thievesesakal
Updated on

भडगाव : शहरातील मेनरोडवरील संकुलासह इतर पाच ते सहा दुकाने व हॉटेलवर बुधवारी (ता. १२) रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. यात मोबाईल व कापड दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून कपडे, वस्तूंसह काही रक्कम असा २६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत दुकानमालक शुभम संजय जैन (रा. पूर्णपात्रे गल्ली, ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जैन यांच्या रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे जिन्स पॅंट, शर्ट व दुकानातील काऊंटरमधून तीन हजार रुपये लंपास केले.(Crime Update Hotels are the target of thieves jalgaon crime news)

Hotels are target of Thieves
Jalgaon : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेस मारहाण

तसेच आबा देवराम धनगर यांच्या माऊली जनरल स्टोअर्स या दुकानातून ३ हजार रुपये किमतीचे स्कूलबॅग व इतर सामान तसेच दुकानातील काऊंटरमधून ५ हजार रुपये चोरीस गेलेले आहेत.

या मेनरोडलगत अजून काही दुकानांवर चोरीचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. तसेच पाचोरा रस्त्यालगत आनंदा जगन्नाथ महाजन यांच्या हॉटेलमधून ७७० रुपये किमतीचे सिगारेटचे पाकीट, पान, ७० रुपये चोरीस गेलेले आहेत. असा सर्व दुकानदारांचे मिळून २६ हजार ७७० रुपये किमतीच्या वस्तूंसह किरकोळ रोख रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या चोरीच्या घटना सकाळी उघडकीस आल्या आहेत. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या आदेशान्वये पोलिस कर्मचारी विलास पाटील तपास करीत आहेत.

Hotels are target of Thieves
Indian Culture : भारतीय कला संस्कृतीचे दर्शन साता समुद्रापार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com