Success Story : पाक सीमेजवळ अहिराणी तरुणाने रोवला झेंडा; तरुणांसाठी रोलमॉडेल...!

Ahirani youth has successfully established hotel business in place very close to Pakistan border jalgaon news
Ahirani youth has successfully established hotel business in place very close to Pakistan border jalgaon newsesakal

Jalgaon News : जिद्द अन् चिकाटीची धरता कास, येवोत संकटे किती ही.. यश मिळेल हमखास’ या काव्यपंक्तीचा आधार घेत एका अहिराणी तरुणाने चक्क पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय यशस्वीरित्या करून दाखवला आहे. (Ahirani youth has successfully established hotel business in place very close to Pakistan border jalgaon news)

समुद्रसपाटीपासून ९ हजार फूट उंचीवर असलेल्या काश्मीरमध्ये बर्फाच्छादित प्रदेशात या तरुणाने आपले पाय घट्ट रोवले आहेत. या यशस्वी तरुणाचे नाव आहे हितेश पाटील. तो जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील करणखेडा या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी आहे. असा हा यशस्वी तरुण इतर तरुणांसाठी रोलमॉडेल ठरत आहे.

इच्छाशक्ती असेल तर आपण कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने मार्ग काढू शकतो हेच हितेश पाटील यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे नऊ हजार फूट उंचीवर असलेल्या काश्मीरमधील सोनमर्ग येथील संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेशात हितेश पाटील हॉटेल चालवित आहेत.

विशेष म्हणजे, हे ठिकाण पाकिस्तान सीमेजवळ स्थित आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो किलोमीटर अंतरावर हा तरुण काम करीत आहे, याचा अभिमानही गावकऱ्यांना दिसून येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ahirani youth has successfully established hotel business in place very close to Pakistan border jalgaon news
Temperature Rise : जळगावचे तापमान पुन्हा 43 अंशांवर

दोन अहिराणी मनाची झाली भेट

मारवड (ता.अमळनेर) येथील मूळ रहिवासी व नागपूरचे आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी आपले निवृत्त मुख्याध्यापक पिता आर. एच. पाटील व मातोश्री यांना पर्यटनासाठी घेऊन गेले होते. श्री. साळुंखे हे प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी असले तरी आपल्या कुटुंबासमवेत अहिराणी भाषेत गप्पा मारतात.

अश्याच गप्पा काश्मीरमध्ये ऐकून हितेश पाटील अवाक झाले. त्यांनी ओळख काढून गप्पा मारल्या. विशेष म्हणजे, दोघांचे गाव शेजारी शेजारी असल्यामुळे आपोआपच आपलेपणाची भावना जागृत झाली. अहिराणीत गप्पा मारता मारता काश्मीरमध्ये ‘पिठलं - भाकरी’ या खान्देशी मेनूवर यथेच्छ ताव मारता आला, हे विशेष!

"आपल्याला जीवनात प्रगती करायची असेल तर आपण कोणताही व्यवसाय निवडू शकतो. प्रतिकूल परिस्थितीत अशक्य गोष्ट ही शक्य करून दाखवू शकतो, हे हितेश पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. त्याची यशोगाथा इतरांसाठी प्रेरणादायी आहे." - संदीपकुमार साळुंखे, आयकर आयुक्त, नागपूर

"रिकामे मन सैतानाचे घर असते, यासाठी तरुणांनी रिकामे न राहता हाताला काम शोधले पाहिजे. गरिबी परिस्थितीबाबत रडत कुडत बसण्यापेक्षा काहीतरी कामधंदा करा. यश आपोआपच आपल्याकडे चालून येते." - हितेश पाटील, सोनमर्ग, काश्मीर

Ahirani youth has successfully established hotel business in place very close to Pakistan border jalgaon news
Agriculture News : जिल्ह्यात ‘रेशीम शेती’चा वाढला प्रयोग; एकदाच लागवड खर्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com