Jalgaon News: भविष्यातील साहित्य संमेलनात AI कट्टा! ‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्या’वरील परिसंवादात सूर

मिलिंद मराठे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ‌‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
Milind Marathe speaking at Marathi literature seminar based on current technology.
Milind Marathe speaking at Marathi literature seminar based on current technology.esakal

अमळनेर : आगामी सात-आठ वर्षांनी होणाऱ्या साहित्य संमेलनात एआय कट्टा (कृत्रिम बुद्धिमत्ता) असेल. त्यात रोबोटिक कवी, कवयित्री सहभागी होतील. भविष्यात सकस साहित्य उत्पन्न करू शकलो तर तंत्रज्ञान उपयोगी ठरेल.

ज्यामुळे सामान्यांचे हित होत असेल, त्यास साहित्य मानावे, असे प्रतिपादन नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी केले. (AI Katta in Future sahitya sammelan demand in seminar on Marathi literature based on current technology Jalgaon News)

ते ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ‌‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दीपक शिकारपूर (पुणे), नम्रता फलके (नागपूर), मिलिंद कीर्ती (दत्तवाडी), सागर जावडेकर (पणजी-गोवा), संदीप माळी (मुक्ताईनगर) यांनी परिसंवादात सहभाग घेतला.

शिकारपूर म्हणाले, की आयुष्यात ऐटीत जगाचे असेल तर आयटी वापरावे. लवकरच आभासी साहित्य संमेलन होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मेटाव्हर्स हे एक प्रभावी तंत्रज्ञान आहे. लॉकडाउन काळात हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचे सकारात्मक व नकारात्मक पैलू आहेत. तंत्रज्ञानाला शत्रू मानू नका, त्यास स्नेही मानावे, असे मत त्यांनी मांडले.

फलके म्हणाल्या, की ललित साहित्यात जयंत नारळीकर यांनी यंत्रमानव व मानव यांच्या भावविश्वाचे चित्रण केले आहे. आज पुस्तक हार्ड, सॉफ्ट, ऑडिओ, व्हिज्युअल या चार फॉर्मेटमध्ये येते.

ऑनलाइन जाहिरातींच्या माध्यमातून अनेकांनी हजारो पुस्तकांची विक्री केली आहे. डिजिटल मीडिया हे आता मेन स्ट्रीम झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कीर्ती म्हणाले, की पाचवी डिजिटल महासत्ता म्हणून भारताचा उदय होत आहे. मोबाईलचा वापर करणारे लोक हे लेखक बनले आहेत. कोणीही लिहू शकतो, प्रसिद्ध करू शकतो. एआयमुळे यंत्रे बोलू व चालू लागली आहेत.

Milind Marathe speaking at Marathi literature seminar based on current technology.
Jalgaon News : मराठा ओबीसी समाज बांधवांनी एकत्र राहणे गरजेचे : प्रवीण गायकवाड

ही यंत्रे तुमच्यावर पाळत ठेवून आहेत. ऑनलाइन खरेदीत डिस्काउंटच्या माध्यमातून वस्तूंच्या किमती कमी होत आहेत. मानवाची सृजनशीलता कमी होत आहे.

तंत्रज्ञान मोफत मिळत असल्याने त्याची भुरळ पडली. मात्र, एआय अणुबॉम्बपेक्षा अधिक विध्वंसक होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

जावडेकर म्हणाले, की अनेक क्षेत्रांत वेबसाईट निर्माण होत आहे. आयटी क्षेत्र वरदान ठरत असताना त्याचा दुरुपयोग होऊ नये, अशी अपेक्षा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही वरदान नसून, तिचा कमीत कमी वापर करावा. तंत्रज्ञानाचा वापर करा, बुद्धिमत्ता गहाण टाकू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

माळी म्हणाले, की तंत्रज्ञानामुळे साहित्यात बदल होत आहे. वाचक, लेखक यांची संख्या वाढत आहे. वर्तमानपत्रात आपले साहित्य छापून आणण्याचा विचार मागे पडत आहे.

इंटरनेटवर प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याचा दर्जा त्याला मिळणाऱ्या कमेंट, लाईक, व्ह्यूवरून ठरविला जात आहे. इ-बुक, ऑडिओ बुकद्वारा प्रकाशकांची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. पुस्तक प्रकाशनाचा खर्च नगण्य झाल्याचे मत त्यांनी मांडले. योगेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Milind Marathe speaking at Marathi literature seminar based on current technology.
Jalgaon: गिरीश प्रभुणे यांनी जातपंचायतीला केलेले समर्थन लोकशाहीला घातक; जातपंचायत मूठमाती अभियानाने केला तिव्र निषेध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com