Latest Marathi News | जळगावकरांचं विमान 7 महिन्यांपासून जमिनीवर; मुंबईत जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air Service Close

जळगावकरांचं विमान 7 महिन्यांपासून जमिनीवर; मुंबईत जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे हाल

जळगाव : सुमारे सात महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली जळगावची विमानसेवा अद्यापही सुरू होऊ न शकल्याने उद्योजक व व्यापाऱ्यांचे मुंबईला जाण्यासाठी हाल होत असून, ती त्वरित सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विमानसेवा सुरू होण्याबाबत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून जळगावचा विमानतळ बांधण्यात आला आहे. तत्कालीन राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विमानतळाचे उद्‍घाटन झाले होते. मात्र या ना त्या कारणामुळे विमानसेवा खंडित होत आहे.

विमानसेवेमुळे जळगावचे नाव देशपातळीवर नोंदविले गेले होते. विमानाने काही तासांतच देशाच्या कान्याकोपऱ्यात पोचू, असा विश्वास येथील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील, अभियंते व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत होता. मात्र काही महिने सुरू सेवा सुरू होती. नंतर त्यात अनेक कारणांनी ती बंद पडली आहे. आता तर गेल्या सात महिन्यांपासून सेवा बंदच आहे. त्यामुळे शासनाने विमानतळावर केलेला कोट्यवधीचा खर्च वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.(Air service of Jalgaon closed for seven months plight of entrepreneurs and businessmen going to Mumbai due to airline ban Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon : नवीन बसस्थानकात आढळला मृतदेह

मार्च महिन्यापासून जळगावची विमानसेवा बंद असल्यामुळे, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तीन वर्षांपूर्वी उडान योजनेंतर्गत हैदराबाद येथील ट्रूजेट या विमान कंपनीने जळगावची विमानसेवा सुरू केली होती. अपेक्षित प्रवासीसंख्या मिळत नसल्यामुळे आर्थिक तोटा झाल्याचे सांगत, विमान कंपनीने जळगावची विमानसेवा बंद केली आहे.

ट्रूजेटचे ७५ टक्के भागभांडवल विन एअर या परदेशी कंपनीने विकत घेऊन, जळगावची सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र या कंपनीने ट्रूजेटला ठरलेल्या भागभांडवलापैकी एकही रुपया न दिल्याने, ट्रूजेटने विन एअर कंपनीकडे कोठलीही सेवा वर्ग केली नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जळगावची विमानसेवा उडान योजनेची दिल्लीतील बैठक होईपर्यंत बंदच राहू शकते.

"जळगाव विमानसेवेचा रूट हा उडान योजनेंतर्गत विमानसेवा चालविण्यासाठी मंजूर झाला आहे. दिल्लीला उडान योजनेची बैठक होणार आहे. त्यात जळगावच्या विमानसेवेबाबत चर्चा होईल."

रोझी रवींद्रन, संचालक, जळगाव विमानतळ

हेही वाचा: Jalgaon : काढणी पश्चात पिकांचे नुकसान 72 तासांत कळवा; जिल्हाधिकारी मित्तल यांचे आवाहन