Akshaya Tritiya 2023 : अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजार फुलला

Akshaya Tritiya
Akshaya Tritiya esakal

Jalgaon News : अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, त्यासाठी बाजारात आंबे, घागर खरेदीसाठी महिलांसह नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होेती. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला जळगावातील बाजारपेठ गजबजली होती. (Akshaya Tritiya 2023 on eve Huge crowd of citizens including women for shopping jalgaon news)

अक्षयतृतीया शुभ मुहूर्त असून, या दिवशी पितरांच्या नावाने घागर भरली जाते. या मुहूर्ताला घर खरेदी, वाहन खरेदी, सोने -चांदी खरेदी करण्याचा मुहूर्त साधत असतात. त्यानुसार शनिवारी (ता. २२) शहरातील वाहन विक्री दालनात, सुवर्णबाजारात मोठी गर्दी पाहण्यास मिळणार आहे. घरी खरेदीच्या व्यवहारातही मोठी उलाढाल होणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Akshaya Tritiya
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची जोरदार तयारी; शिवसैनिकांचा उत्साह शिगेला!

आंबे खरेदीसाठी गर्दी

अक्षयतृतीयेला घागर भरली जाते. त्यासाठी आंबे खरेदीसाठी शुक्रवारी (ता. २१) बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. बदाम ७० रुपये, तर केशर १०० रुपये किलो, देवगड हापूस ७००, तर रत्नागिरी हापूस ८०० रुपये डझन, असे आंब्यांचे भाव होते.

घागरीला मोठी मागणी

अक्षय तृतीयेला पूर्वजांचे घागर भरण्याची पंरपरा आहे. घागर विक्रीचे दुकाने शहरातील विविध परिसरातील मुख्य चौकांमध्ये, तसेच बाजारात थाटलेली होती. घागरीचे दर ७० पासून ते १०० रुपयांपर्यंत होते. पूजा-साहित्य, केळीचे पाने, गवरी खरेदीसाठी नागरिकांची शुक्रवारी सायंकाळी गर्दी बाजारात झाली होती.

Akshaya Tritiya
Jalgaon News : ‘ते’ अतिक्रमण 45 दिवसांच्या आत काढा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com