शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गुलाबराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गुलाबराव पाटील

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गुलाबराव पाटील

धरणगाव : आज अत्यंत विपरीत स्थिती असली तरी कुणी जीवन संपविण्याचा विचारदेखील मनात आणू नये, दिवस हे परीक्षा घेणारे आणि संघर्षाचे असले तरी राज्य शासन (State government)हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Raghunath Patil) यांनी केले.

हेही वाचा: Manipur Election : प्रादेशिक पक्षांतील स्पर्धा भाजपच्या पथ्यावर?

पालकमंत्र्यांच्या हस्ते येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत १५ महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या सहायता धनादेशाचे वितरण आणि आत्महत्याग्रस्त ३ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये शासकीय मदतीचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना तीन महिन्याच्याआत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांच्या अर्थसाहाय्याचा धनादेश दिला जातो. याअंतर्गत धरणगाव तालुक्यातील १५ महिलांना प्रत्येकी २० हजार याप्रमाणे एकूण ३ लाख मंजूर प्रस्तावाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

हेही वाचा: Goa Election : भाजपला पर्रिकरांची उणीव भासणार

यामध्ये मंगलाबाई पाटील (बोरगांव बु), सुनंदा अहिरे (खुर्द), आशाबाई पाटील (कल्याणे खुर्द), निंबाबाई पाटील (वाकटुकी), जिजाबाई भिल (बाभळे), तुळसाबाई पाटील (चांदसर), पुनम गोसावी (झुरखेडा), छाया भालेराव (वाघळुद बुद्रुक), वसंताबाई पाथरवट (वाघळुद खुर्द), रंजना मोरे (वाघळुद खुर्द), कविता पाटील (वराड बुद्रुक), पुजा बाविस्कर (साळवा), रिंकु भिल (वराड बुद्रुक), अंजनाबाई पाटील (पिंपळे खुर्द) आणि सरला पाटील (धरणगाव) या महिलांना धनादेश प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी एरंडोल विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे, प्रेमराजबापू पाटील, चर्मकार संघाचे भानुदास विसावे, चांदसर सरपंच सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: UP Assembly Election : ‘ती’ ठरविणार सत्ताधारी!

शेतकऱ्यांना मदत

याच कार्यक्रमात मौजे बोरखेडा येथील  मयत शेतकरी कैलास पाटील त्यांचे वारस म्हणून पत्नी संजूबाई पाटील,  अतुल देशमुख यांचे वारस म्हणून पत्नी रोहिणी देशमुख, किशोर जाधव यांचे वारस म्हणून पत्नी ललिता जाधव यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश व एक महिन्याचा किराणा व ब्लँकेट वाटप करण्यात आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top