शिवसेनेला दिलेली रूग्णवाहिका मुख्यमंत्री शिंदे गटाने परत घेतली | Latest Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath shinde government latest marathi news

शिवसेनेला दिलेली रूग्णवाहिका मुख्यमंत्री शिंदे गटाने परत घेतली

जळगाव : शिवसेना ( Shiv sena) आणि शिंदे गटात सुरू असलेला वाद आता स्थानिक पातळीवर तीव्र होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या माध्यमातून जळगाव महानगर शिवसेनेला (Shiv sena) देण्यात आलेली रूग्णवाहिका (Ambulance) शुक्रवारी (ता. २२) शिंदे गटाने परत घेतली आहे. (ambulance given to Shiv Sena was taken back by Chief Minister Shinde group jalgaon Latest Marathi news)

हेही वाचा: Nashik : अर्धवट कामामुळे जागोजागी चिखलाचे साम्राज्य

शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी सांगितले, की आज दुपारी शिंदे गटात गेलेले राज्याचे माजी मंत्री गुलाबराव पाटील यांचे पूत्र प्रताप पाटील यांचा आपल्याला फोन आला व त्यांनी शिवसेनेला दिलेली रूग्णवाहिका परत द्या, असे सांगितले. याबाबत आपण महानगरप्रमुख शरद तायडे यांना फोन केला.

त्यानंतर त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली व आपणास रूग्णवाहिका देण्यास सांगितले, त्यानुसार सुरळकर यांनी चालकास फोन करून रूग्णवाहिकेची चावी प्रताप पाटील यांना देण्यास सांगितले. दुपारी दोन वाजता रूग्णवाहिका त्यांना सुपूर्द करण्यात आली.

श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ही रूग्णवाहिका शहर शिवसेनेला मिळाली होती. शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही रूग्णवाहिका दीड वर्षांपूर्वी देण्यात आली होती. ऑक्सिजनची सुविधा असलेली ही रूग्णवाहिका शिवसेनेतर्फे जळगाव शहरासह इतर गरजूंसाठी उपयोगात येत होती.

हेही वाचा: आमदार सुहास कांदे यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे खुले : आदित्य ठाकरे

Web Title: Ambulance Given To Shiv Sena Was Taken Back By Chief Minister Shinde Group Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top