युवकांमध्ये लसीकरणासाठी उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

among youth Enthusiasm for vaccination
युवकांमध्ये लसीकरणासाठी उत्साह

जळगाव : युवकांमध्ये लसीकरणासाठी उत्साह

जळगाव : शहरासह जिल्ह्यात पंधरा ते अठरा वयोगटांतील युवक, युवतींनी लस (vaccination) घेण्यास सुरवात केली आहे. त्यांच्यात उत्साह दिसून आला. सर्वच वयोगटांतील नागरिकांनी लस घेऊन कोरोनापासून सुरक्षित राहावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulab Patil) यांनी सोमवारी (ता. ३) येथे केले. दिवसभरात २२४२ तरुणांना लस देण्यात आली.

युवकांसाठी लसीकरण केंद्राचे (Vaccination Center) उद्‌घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात झाले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रावलानी उपस्थित होते.

‘माझा जीव, माझी जबाबदारी’

मंत्री पाटील म्हणाले, की १८ वर्षांवरील ६५ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस अनेकांनी घेतला नाही. शासनाने कोरोनापासून सर्वांनाच वाचविण्यासाठी लशींचे सुरक्षाकवच मोफत उपलब्ध करून दिले आहे. तरीही नागरिक त्याचा लाभ घेताना दिसत नाही. तिसरी लाट समोर आहे. त्यातून वाचयाचे असल्याने प्रत्येकानी ‘माझा जीव, माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवावी. लस घेऊन स्वतःला कोरोनापासून सुरक्षित करावे. तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा नियोजन समितीतून ३५ ते ४० टक्के राखीव ठेवण्यात आला आहे.

...तर पुन्हा लॉकडाउन

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की लॉकडाउन संदर्भात शासनाने गाइडलाइन दिल्या आहेत. त्यात कोरोना पॉझिटिव्हीटीची टक्केवारी व किती प्रमाणात (टक्के) ऑक्सिजन लागतो यावर लॉकडाउन अवलंबून आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली, रुग्णांना ऑक्सिजनची अधिक गरज भासू लागली तर लॉकडाउन होईल. हे टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःला लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लस घेतली, की थेट कोरोना पॉझिटिव्हीटीपासून बचाव करू शकतो. १५ ते १८ वयोगटांसाठी आजपासून लसीकरण सुरू झाले. युवकांचा चांगला प्रतिसाद आहे. ४५ हजार लशी उपलब्ध आहेत.

"युवकांमध्ये लस घेण्याबाबत उत्सुकता होती. आज येथे चांगल्या पद्धतीचे लसीकरणाची व्यवस्था झाल्याने आनंद आहे. १५ ते १८ वयोगटांतील सर्वांनी लस घेत स्वतःला सुरक्षित करावे."

-वेदश्री वाणी

"अगोदर ज्येष्ठांना लस भेटली, आम्हाला भेटली नव्हती, यामुळे धोका होता. आता आम्हाला लस मिळाल्याने धोका नाही. आता परीक्षाही आम्ही देऊ शकणार आहे."

-आदिती म्हसकरे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonvaccination
loading image
go to top