Latest Marathi News | जळगावच्या भव्य सभेत हिंदू राष्ट्राचा हुंकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: People attended the meeting held at Shivtirtha by Hindu Janajagruti Samiti. Speaking in the second meeting, Suresh Chavanke

Jalgaon News : जळगावच्या भव्य सभेत हिंदू राष्ट्राचा हुंकार

जळगाव : यापुढे खानदेश नव्हे, तर ‘कान्हादेश’ म्हणायला हवे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या भूमीमध्ये क्रूरकर्मा टीपू सुलतान आणि औरंगजेब यांचे उदात्तीकरण का केले जात आहे? छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास आणि स्वाभिमान समोर ठेऊन जीवन जगा, असे आवाहन सुदर्शन न्यूज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले.

शिवतीर्थ मैदानावर रविवारी झालेल्या हिंदू राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्‌गुरु नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे यांनीही उपस्थित हिंदूंना संबोधित केले. (Announced of Hindu Rashtra in Jalgaon grand meeting Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon News : शहरालगत नव्या MIDCचा प्रस्ताव

हिंदू राष्ट्र जागृती सभेला सहस्रो हिंदूंनी उपस्थिती दर्शवून ‘अब, जो हिंदू हितकी बात करेगा, जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा’, असा निर्धार केला. सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी अमोल वानखेडे यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती पुरुषोत्तम शुक्ल, भूषण मुळे, श्रीराम जोशी, प्रवीण जोशी, महेश जोशी यांनी वेदमंत्र पठण केले. समितीचे सतीश कोचरेकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सनातन प्रकाशित ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Jalgaon News : मुद्दे संशयास्पद अन्‌ वादही Scripted... गांभीर्य नको!

हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याला आरंभ करा : सुनील घनवट

पुरोगामी आणि धर्मांध संघटनांच्या विरोधानंतर पद, पक्ष, संघटना, संप्रदाय सर्व बाजूला ठेऊन हिंदू राष्ट्र जागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंच्या संघटित शक्तीचा जळगाव पॅटर्न तयार झाला आहे. आतापासून हिंदू राष्ट्रासाठी कार्य करण्यास आरंभ करा, असे सुनील घनवट यांनी सांगितले.

धर्मशिक्षण घेतल्यास स्त्रिया सुरक्षित : नंदकुमार जाधव

धर्मपालन करणे आज हिंदूंना हास्यास्पद वाटत आहे. कपाळावर कुंकू लावण्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. या मागील धर्मशास्त्र समजून घेतल्यास ‘कुंकू लावणे’ हा मागासलेपणा वाटणार नाही. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केल्यास स्त्रिया सर्वदृष्ट्या सुरक्षित होऊ शकतात, असे नंदकुमार जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा: Mahad News : मनुस्मृती दहन दिनानिमित्त हजारो भीमसैनिकांची गर्दी; महिलांची रॅली

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी धर्माचरण आवश्यक : रागेश्री देशपांडे

श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करणारा आफताब, झारखंड येथील रिबिका पहाडीन हीचे इलेक्ट्रिक कटरने ५० तुकडे करणारा दिलदार अन्सारी, बुरखा घालण्यास नकार दिला, म्हणून रूपाली चंदनशिवे हिचा भर रस्त्यात गळा चिरणारा इक्बाल मोहंमद, इस्लाम स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निधीला चौथ्या माळ्यावरून खाली फेकून देणारा सुफियान हे सर्व एकाच जमातीचे लव्ह जिहादी आहेत. हे ‘जिहादी संकट’ रोखण्यासाठी हिंदू मुलींनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन रागेश्री देशपांडे यांनी केले.

हेही वाचा: Jalgaon News : मंडलाधिकाऱ्याला डंपरमधून बाहरे फेकले

टॅग्स :JalgaonHindu religion