Jalgaon News : ‘अंत्योदय सोलर कुकर’ गरीबांसाठी वरदान; इंधनाची बचत

Antyoday Yojna News
Antyoday Yojna Newsesakal

Jalgaon News : समाजातील शेवटच्या घटकाची जाणीव ठेवत येथील डॉ. अतुल सरोदे यांनी अतिशय स्वस्त व परवडणाऱ्या सोलर कुकरची संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. या सोलर कुकरमुळे इंधनाची बचत होत असल्याने हा कुकर सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे सुपुत्र असलेले डॉ. अतुल सरोदे हे एम. डी. मेडिसीन असून आपल्या शामल हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण सेवा करतात. यासोबतच ते राजकीय व सामाजिक जीवनातही कार्यरत आहे.(Antyodaya Solar Cooker is a boon for poor Dr Sawada Concept realized by Atul Sarode Fuel savings Jalgaon News)

भाजपच्या राष्ट्रीय परीषदेचे ते सदस्य आहेत. त्यांना नवनवीन प्रयोग करण्याचा छंद आहे. समाजातील शेवटच्या घटकासाठी काही करता येईल का या उद्देशाने त्यांनी सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा सोलर कुकरची संकल्पना साकारली आहे.

हा कुकर अगदी झोपडीत जीवन जगणाऱ्यांसाठीही लाभदायक ठरणारा आहे. वाढत्या महागाईमुळे गरीबाला अकराशे रुपये देऊन गॅस सिलिंडरची हंडी परवडत नाही. सरपणही महागलेले असल्याने ते देखील वापरणे अवघड होते. घरात वीज नसेल तर तो विजेवर चालणारी उपकरणे देखील वापरू शकत नाही. अशा कुटुंबाला सोलर कुकर वरदान ठरणार आहे.

Antyoday Yojna News
Jalgaon Election News : भाजप लोकसभा उमेदवारीची भाकरी फिरविणार का?

असा आहे सोलर कुकर

डॉ. सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोलर कुकर तयार करण्यासाठी एक साधा ८ एमएमचा दीड फूट बाय दीड फूट आकाराचा काच, काळा रंग मारलेला एक डबा, एक लोखंडी तारेचा स्टँड, एक मातीचे मडके व अल्युमिनियम फॉइल पेपर दीड मीटर हे साहित्य लागते. कुकर तयार करायला केवळ १५ मिनिटे लागतात. शिवाय त्याला बनवायला खूपच कमी खर्च येतो.

या कुकरमध्ये तांदूळ, बटाटा शिजवणे, भाजी, भुईमूग शेंगा भाजणे एवढेच नव्हे तर नॉनव्हेज देखील तयार होऊ शकते. अन्न शिजवायला साधारणतः एक तास लागतो. कुकरच्या तंत्रज्ञानाबाबत सांगताना डॉ. सरोदे यांनी सांगितले, की सोलर कुकर दोन प्रकारचे असतात. एक पॅराबोलीक आणि एक बॅाक्स सोलर कुकर.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Antyoday Yojna News
Jalgaon News : जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू; पोहण्याचा मोह जिवावर बेतला

पॅराबोलिक सोलर कुकर साधारणतः पंधरा हजारांपर्यंत तर बॅाक्स सोलर कुकर सात हजारांपर्यंत मिळतो. त्या तुलनेत ‘अंत्योदय सोलर कुकर’ हे अत्यंत कमी किमतीत घरच्या घरी बनवू शकतात.हा कुकर दोन्हींचे मिश्रण हायब्रीड आहे. तुटलेले मडके हे पॅराबोलिक कुकरचे काम करते. बॅाक्स सोलर कुकरला जे उष्णताविरोधी आवरण लागते, ते ग्लासवूलचे असते. या कुकरमध्ये मातीचे मडके हेच उष्णताविरोधाचे काम करते.

पॅराबोलिकचे काम सर्व उष्णतेला एका ठिकाणी एकत्र करणे आहे. या कुकरमुळे गॅस, सरपण किंवा विद्युत असेल ती ७० टक्क्यांपर्यंत वाचू शकतो. विशेषतः आदिवासी बांधव याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतात.

घरी बनवलेल्या या सोलर कुकरमध्ये डॉ. सरोदे यांनी स्वतः तांदूळ शिजवून चांगला भात तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.महागडे इंधन, वीज आदींची बचत करू शकणारा हा कुकर गरिबांसाठी निश्‍चितच वरदान ठरेल, असेही डॉ. अतुल सरोदे यांनी सांगितले.

Antyoday Yojna News
Dhule News : डोंगरगावच्या शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com